तभा वृत्तसेवा
वणी,
summer-cricket-training-camp : उन्हाळ्याच्या सुट्ट्यांचा सदुपयोग करून युवकांमध्ये क्रीडा कौशल्य विकसित करण्याच्या उद्देशाने सक्षम युथ स्पोर्ट अकॅडमीच्या वतीने ‘उन्हाळी क्रिकेट प्रशिक्षण शिबिर 2026’ आयोजित करण्यात आले आहे. या शिबिराला विद्यार्थ्यांकडून उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत असून प्रवेश नोंदणी सुरू झाली आहे.
हे शिबिर 6 मे ते 26 जून दरम्यान सक्षम इंग्लिश मिडियम स्कूलचे मैदान, वणी येथे सुरू झाले आहे. दररोज सकाळी 6.30 ते 8.30 आणि दुपारी 4.30 ते 6.30 अशा दोन सत्रांमध्ये प्रशिक्षण सुरू आहे. 9 ते 19 वर्षे वयोगटातील मुला-मुलींसाठी हे शिबिर खुले आहे.
मर्यादित जागा असल्यामुळे ‘प्रथम येणाèयास प्राधान्य’ या तत्त्वावर प्रवेश दिला जाणार असल्याची माहिती आयोजकांनी दिली. या उपक्रमासाठी संघदीप भगत, कर्मा तेलंग, पायल तोडसाम, निखिल तेलंग, विजय बदकी, प्रतीक मत्ते, आकाश कनोजिया आणि मनमोहन पामुलवार हे प्रशिक्षक व संपर्क प्रमुख म्हणून कार्यरत आहेत.
उन्हाळ्यातील सुट्टीत मुलांच्या सर्वांगीण विकासासाठी हे शिबिर उपयुक्त ठरणार असून वणी परिसरातील क्रीडाप्रेमींमध्ये या उपक्रमाबाबत उत्सुकता निर्माण झाली आहे. शिबिरासाठी संघदीप भगत (9822699908), निखिल तेलंग (9096198646), विराज बदकी (7768838133) यांच्याशी संपर्क साधण्याचे आवाहन करण्यात आले.