कॅफेच्या आड सुरु असलेल्या हुक्का पार्लरवर ‘सर्जिकल स्ट्राईक’

- 106 जणांविराेधात गुन्हा दाखल

    दिनांक :13-May-2026
Total Views |
अनिल कांबळे
नागपूर,
hookah parlor गेल्या काही महिन्यांपासून शहरात कॅफेच्या आड हुक्का पार्लर सुरु असून याचे लाेण झपाट्याने वाढत आहे. अनेक हुक्का पार्लर संचालकांशी पाेलिसांचे ‘अर्थपूर्ण’ संबंध असल्यामुळेच हुक्का पार्लरची संख्या वाढली आहे. पाेलिसांनी 24 तासांत शहरातील चार कॅफेवर कारवाई केली. यात 106 जणांविराेधात गुन्हा दाखल करण्यात आला असून त्यात तरुणी आणि महिला ग्राहकही ताब्यात घेण्यात आले.
 

hookah parlor 
 
 
गाेकुळपेठ येथील भांगे काॅम्प्लेक्समधील ‘साेराे कॅफे ’वर पाेलिसांनी छापा टाकला. यावेळी कॅे चालक ज्ञानेश्वर गणपती पाैनिकर (34) हा 17 पुरुष आणि 5 तरुणी व महिला ग्राहकांना प्रतिबंधित तंबाखूजन्य हुक्का पुरवित असल्याचे आढळले. पाेलिसांनी हुक्का पाॅट, विविध फ्लेवरचे तंबाखू आणि इतर साहित्य असा एकूण 1 लाख 16 हजार 580 रुपयांचा मुद्देमाल जप्त केला. या प्रकरणात कॅफेचालक, वेटर आणि ग्राहकांसह 29 जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला.
 
याच परिसरातील लक्ष्मी अपार्टमेंटमध्ये सुरू असलेल्या ‘निंबस लाऊंज’वरही पाेलिसांनी धाड टाकली. येथे चालक शेख समीर उर्फ वकील अहमद (32) हा 14 वेटरच्या मदतीने 23 पुरुष आणि 3 महिला ग्राहकांना हुक्का पुरवत असल्याचे समाेर आले. या कारवाईत 71 हजार 55 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. चालक, वेटर आणि ग्राहक अशा एकूण 41 आराेपींविरुद्ध विविध कलमांन्वये गुन्हे नाेंदविण्यात आले आहेत.
 
गाेकुळपेठ येथील ‘हॅष कॅे’वर कारवाई करताना चालक अर्सलान फहीम मिर्झा (24) हा 9 पुरुष आणि 4 महिला ग्राहकांना हुक्का पुरवत असल्याचे पाेलिसांना आढळले. येथून 40 हजार 780 रुपयांचे साहित्य जप्त करण्यात आले असून 15 आराेपींविरुद्ध गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. याशिवाय कपिलनगर पाेलिस ठाण्याच्या हद्दीतील मानवनगर परिसरातील ‘नेटफफ्लेक्स चिल कॅे’वरही पाेलिसांनी कारवाई केली. कॅफे चालक साेहेल खान फिराेज खान (22) हा एका वेटरच्या मदतीने 19 ग्राहकांना प्रतिबंधित हुक्का पुरवत असल्याचे समाेर आले.hookah parlor या ठिकाणाहून 82 हजार 995 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. चालक, वेटर आणि ग्राहकांसह 21 आराेपींवर गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. या कॅफे वर काही दिवसांअगाेदरच धाड टाकण्यात आली हाेती.
तीन कॅफे महिन्याभरासाठी ‘क्लाेज’
वारंवार नियमांचे उल्लंघन करणारे अंबाझरी पाेलिस ठाण्याच्या हद्दीतील साेराे कॅफे , निंबस लाऊंज आणि हॅश कॅफे या तिन्ही कॅेच्या संचालकांना यापूर्वी पाेलिस उपायुक्त यांच्याकडून नाेटीस बजावण्यात आली हाेती. मात्र, त्यानंतरही त्यांनी काेणताही प्रतिसाद दिला नसल्याने पाेलिसांनी कठाेर पाऊल उचलत 11 मे पासून पुढील 30 दिवसांसाठी तीनही कॅफे सीलबंद करण्यात आले आहेत.
हुक्क्यासाठी महिला व तरुणींची गर्दी
गेल्या काही दिवसांपासून शाळकरी मुली, महाविद्यालयीन तरुणी आणि विवाहित महिलांचीसुद्धा हुक्का पार्लरमध्ये गर्दी वाढत आहेत. ‘स्टेट्स सिम्बाॅल’ म्हणून अनेक तरुणी हुक्का पिण्यासाठी जाताना दिसत आहेत. तसेच विवाहित महिलांमध्ये हुक्क्याचे व्यसन वाढल्याचे दिसून येत आहे. पाेलिसांच्या छाप्यात तरुणी आणि महिलांना ताब्यात घेण्यात आल्यामुळे ही बाब उघडकीस आली.