वर्धा,
traffic police body worm cameras वर्धा शहरात अपघाताचे प्रमाणात वाढ झाली आहे. अपघात कमी करण्यासाठी पोलिस अधीक्षक सौरभ कुमार अग्रवाल यांनी जिल्ह्यात अपघात संख्या कमी करावे, अति वेगाने वाहन चालवीणारे, दारू पिवून वाहन चालवीणार्यांवर कार्यवाही करण्याचे आदेश दिले. जे नियमांचे उल्लंघन करतील त्यांचे फोटो, व्हिडीओ काढण्याकरिता वाहतूक पोलिसांना चलान करताना पुरावा म्हणून सुद्धा बॉडी वॉर्म कॅमेर्यांचा उपयोग होणार आहे. कॅमेरा वाहतूक ड्युटीवर नेमलेले अंमलदार आपले गणवेशावर लावतील व त्यात फोटो, ऑडिवो व व्हिडीओ ही काढू शकणार आहेत. जे चालक दारू पिवून गाडी चालवतात त्यांच्या गाडीचेही व्हिडीओ शूटिंग करता येणार आहे.

चालक चलान केल्यावर वादविवाद करतात त्या घटनांचीही व्हिडीओ शूटिंग या कॅमेर्यात होणार आहे. त्यामुळे वाहतूक अंमलदारांच्या सुरक्षेकरिता ही या बॉडीवोर्म केमेराचा उपयोग हा होणार आहे. या शासकीय बॉडीवोर्म केमेरा मधील फोटोग्राफी, ऑडिओ ग्राफी व व्हिडीओ ग्राफीमध्ये कोणालाही एडिटिंग वा डिलीट करता येणार नाही. वाहतूक अंमलदाराने आपले चालणं कार्यवाही ही योग्य रीतीने योग्य पुराव्या सह केली की नाही यावर वरिष्ठ अधिकार्यांचे लक्ष राहणार आहे. वाहन चालकांनाही त्यामुळे न्याय मिळेल. वाहन चालक यांनी वाहतूक नियमांचे पालन करावे सुरक्षित प्रवास करावे अपघात होणार नाही याची सर्वांनी दक्षता घ्यावे असे आवाहन वाहतूक पोलिसांनी केले आहे.