लिंबूवरून झालेल्या वादात बारा वर्षांच्या मुलाचा मृत्यू

    दिनांक :13-May-2026
Total Views |
नालंदा,
Twelve-Year-Old Boy Dies बिहारमधील नालंदा जिल्ह्यात लिंबू तोडण्याच्या किरकोळ कारणावरून घडलेल्या वादाने गंभीर वळण घेतले असून बारा वर्षांच्या मुलाचा मारहाणीत मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. अस्थामा पोलीस ठाण्याच्या हद्दीतील सकरवा गावात ही घटना घडली असून परिसरात मोठा तणाव निर्माण झाला आहे.
 
Twelve-Year-Old Boy Dies
 
मिळालेल्या माहितीनुसार, शुभम कुमार नावाच्या अल्पवयीन मुलाने शेजारच्या घरातील लिंबाच्या झाडावरून एक लिंबू तोडला होता. Twelve-Year-Old Boy Dies या कारणावरून संतप्त झालेल्या संबंधित कुटुंबातील दोन युवकांनी त्याला बेदम मारहाण केली. या मारहाणीत मुलाचा मृत्यू झाला. घटनेनंतर गावात संताप उसळला आणि दोन गटांमध्ये संघर्षाची परिस्थिती निर्माण झाली.
  
घटनेची माहिती मिळताच मृत मुलाच्या कुटुंबीयांसह गावकऱ्यांनी आक्रमक भूमिका घेतली. संतप्त जमावाने काही वाहनांची तोडफोड केली असून दगडफेकही करण्यात आली. Twelve-Year-Old Boy Dies या गोंधळात काही पोलीस कर्मचारी जखमी झाल्याची माहिती आहे. परिस्थिती नियंत्रणाबाहेर जात असल्याने अतिरिक्त पोलीस फौज घटनास्थळी दाखल करण्यात आली.
 
वरिष्ठ अधिकारी, जिल्हा प्रशासनातील अधिकारी आणि पोलीस पथक गावात तळ ठोकून असून परिस्थिती नियंत्रणात आणण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत. Twelve-Year-Old Boy Dies काही ठिकाणी जमाव पांगवण्यासाठी बळाचा वापर करण्यात आल्याचेही समजते. दरम्यान, पोलिसांनी या प्रकरणात काही जणांना ताब्यात घेतले असून पुढील तपास सुरू आहे. सध्या गावात तणावपूर्ण शांतता असून कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी मोठा बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे.