वर्धा युवक काँग्रेस अध्यक्षपदासाठी १४ इच्छुक मैदानात

    दिनांक :13-May-2026
Total Views |
वर्धा, १३ मे
Wardha Youth Congress President वर्धा जिल्हा युवक काँग्रेस अध्यक्षपदासाठी स्थानिक शासकीय विश्रामगृहात आज १३ रोजी पदाधिकार्‍यांच्या मुलाखती घेण्यात आल्या. जिल्ह्यातील १४ पदाधिकार्‍यांनी मुलाखती दिल्या. महाराष्ट्र प्रदेश युवक काँग्रेसचे उपाध्यक्ष व विभागीय प्रभारी कपिल ढोके यांच्या अध्यक्षतेखाली तर महाराष्ट्र प्रदेश युवक काँग्रेसचे सरचिटणीस व वर्धा जिल्हा प्रभारी सागर चव्हाण, महाराष्ट्र प्रदेश युवक काँग्रेसच्या सचिव व वर्धा जिल्हा सहप्रभारी आयुषी देशमुख यांच्या उपस्थितीत मुलाखती घेण्यात आल्या.
 
 
Congress President
 
 
निवड प्रक्रिया पूर्णतः गुणवत्ता व पात्रतेच्या आधारावर करण्यात येणार असून येत्या एका महिन्यात नवीन जिल्हाध्यक्ष, विधानसभाध्यक्ष, तालुकाध्यक्ष व संपूर्ण जिल्हा कार्यकारिणी लवकरंच जाहीर करण्यात येईल अशी माहिती मुलाखतीनंतर पत्रकारांशी संवाद साधतांना कपिल ढोके ह्यांनी दिली. यावेळी प्रदेश सचिव अफजल बेरा, अंकुश मुंजेवर उपस्थित होते.