जलजीवन मिशन अंतर्गत नळयोजना सुरु करा

ग्रामस्थांचे तहसीलदारांना निवेदन

    दिनांक :13-May-2026
Total Views |
रिसोड, 
Water scheme under Jaljeevan mission मौजे शेलगाव राजगुरे येथील जल मिशन अंतर्गत बंद असलेली नळ योजना सुरू करा, गावठाण हद्दीतील गट क्र. २३१ मधील ०.३१ आर जमीन गावाच्या स्मशानभूमीसाठी राखीव असलेल्या जमिनीवरील अतिक्रमण काढा, गावातील जिल्हा परिषद शाळे भोवती झालेले अतिक्रमण काढावे, अशी मागणी भागवत वाघ व ग्रामस्थांनी तहसीलदार प्रतीक्षा तेजनकर, गटविकास अधिकारी पंचायत समिती रिसोड यांना १२ मे रोजी दिलेल्या निवेदनात केली आहे.
 
 
yojna
 
 
निवेदनात नमूद करण्यात आले आहे की, मौजे शेलगाव येथे जलजीवन मिशन अंतर्गत नळ योजना राबविण्यात आली होती. सदर योजने अंतर्गत गावात नळ जोडण्यात आले. काही ठिकाणी जोडण्याचे राहिले आहे. जलजीवन मिशन अंतर्गत धरणावर विहीरही खोदण्यात आली आहे. विहिरीला पाणी आहे, परंतु सदर विहिरीतील पाणी आजपर्यंत गावात आले नाही. त्यामुळे जलजीवन मिशन मध्ये मोठा घोटाळा झाल्याचे आल्याचे दिसून येते. या विषयावर तात्काळ लक्ष घालून सदरची नळ योजना चालू करण्याचे आदेश द्यावेत, गावठाण हद्दीतील क्षेत्र गट नं. २३१ मधील ०.३१ आर जमीन गावाच्या स्मशानभूमीसाठी राखीव ठेवली होती. परंतु सदर जमिनीवर अतिक्रमण झालेले आहे.तरी सदर जमिनीवरील अतिक्रमण काढून जमीन मोकळी करून द्यावी, म्हणजे तिथे स्मशानभूमीचे शेड बांधता येईल व गावातील स्मशानभूमीचा प्रश्न सुटेल अशी मागणी निवेदनात