मंगरूळनाथ,
Welcome, Mehnaz Patel राजस्थान प्रांताच्या भाजपा अल्पसंख्यांक मोर्चा सोशल मीडिया प्रमुख मेहनाज पटेल या महाराष्ट्र दौर्यावर आले असता येथील विश्रामगृहात भाजपाच्या वतीने त्यांचे शाल व पुष्पगुच्छ देऊन स्वागत करण्यात आले. राजस्थान भाजपाच्या अल्पसंख्यांक मोर्चा सोशल मीडिया प्रमुख तथा सवाई माधोपुर मतदार संघाच्या अल्पसंख्यांक मोर्चाच्या प्रमुख मेहनाज पटेल या महाराष्ट्र दौर्यावर आले असता त्यांनी मंगरूळनाथ येथे सदिच्छा भेट दिली. यावेळी त्यांनी भाजपा अल्पसंख्यांक महाराष्ट्रातील विविध योजनांबद्दल व अल्पसंख्यांकांच्या ध्येय धोरणाबद्दल भाजपाचे कार्य व अल्पसंख्याकांचा दर्जा उंचावण्याकरिता भाजपा करीत असलेल्या कार्याचे त्यांनी कौतुक केले. तसेच येथील भाजपा पदाधिकार्यांसोबत व कार्यकर्त्यांसोबत विविध विषयावर चर्चा केली. यावेळी भाजपा अल्पसंख्यांक मोर्चाचे जिल्हाध्यक्ष मोहम्मद शारीक यांनी त्यांचे शाल व पुष्पगुच्छ देऊन स्वागत केले. यावेळी भाजपाचे किशोर घोडचर, सुनील मालपाणी, सुधीर घोडचर, शारीक सौदागर, प्रमोद घोडचर, उमेश शृंगारे, रोहन सुरोशे, विजय भोजने व अनेकांची उपस्थिती होती.