यवतमाळच्या सुपुत्राची अमेरिकेत उत्तुंग भरारी

एआय संशोधनात अमेय अग्रवालचे मोठे यश

    दिनांक :13-May-2026
Total Views |
तभा वृत्तसेवा
यवतमाळ, 
ameya-agarwal : यवतमाळचे सुपुत्र अमेय दीपक अग्रवाल यांनी कृत्रिम बुद्धिमत्ता (आर्टिफिशियल इंटेलिजन्स) क्षेत्रात जागतिक स्तरावर ठसा उमटवला आहे.
 
 
y13May-Amey
 
 
 
भारतातील प्रतिष्ठित बिट्स पिलानी येथून 2018 मध्ये संगणक अभियांत्रिकीची पदवी संपादन केल्यानंतर, अमेय यांनी अमेरिकेतील जॉर्जिया टेक विद्यापीठातून पूर्ण शिष्यवृत्तीवर पीएचडी (डॉक्टरेट) मिळवली आहे.
 
 
त्यांनी प्रसिद्ध संशोधक प्रा. अलेक्सी तुमानोव्ह यांच्या मार्गदर्शनात ‘फाऊंडेशन मॉडेल्स’साठी उच्च-कार्यक्षमता प्रणाली विकसित करण्यावर संशोधन केले. अमेय यांनी आतापर्यंत 15 शोधनिबंध लिहिले असून, जागतिक स्तरावरील 5 मोठ्या परिषदांमध्ये त्यांचे सादरीकरण केले आहे.
 
 
यवतमाळ येथील ख्यातनाम डॉ. दीपक व डॉ. सुनीता अग्रवाल यांचे सुपुत्र डॉ. अमेय अग्रवाल यांनी पीएचडीपूर्वी मायक्रोसॉफ्ट रिसर्च बंगळुरू आणि क्युबोल येथे काम केले आहे. ते सध्या अमेरिकेत मायक्रोसॉफ्ट रिसर्चमध्ये ‘व्हिजिटिंग रिसर्च फेलो’ म्हणून कार्यरत आहेत. या यशाबद्दल त्यांचे यवतमाळ जिल्ह्यातून कौतुक होत आहे.