आशियाई थायबॉसिंग स्पर्धेत आर्वीच्या खेळाडूंचे यश

    दिनांक :14-May-2026
Total Views |
आर्वी, 
Asian Thai-boxing Championship पोखरा, नेपाळ येथील क्रीडा संकुलात ८ ते ११ मे दरम्यान आशियाई थायबॉसिंग स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. या स्पर्धेत नेपाल, इंडिया, भुतान, श्रीलंका व इतर काही आशियाई देशातील खेळाडूंनी सहभाग घेत उत्कृष्ट खेळ, शिस्त व क्रीडाभावनेचे प्रदर्शन केले. या स्पर्धेचे आयोजन इंडियन थायबॉसिंग अससोसिएशनचे अध्यक्ष संतोष खैरनार व नेपाळ थायबॉसिंग अससोसिएशनचे अध्यक्ष गणेश कक्षपती यांच्या चमूच्या संयुत वतीने करण्यात आले होते. .
 
 
boxing
 
Asian Thai-boxing Championship  आर्वीच्या खेळाडूंनी उत्कृष्ट कामगिरी केली. विनम्र महाजन याने १० वर्षाखालील वयोगटात प्रथम क्रमांक व नमन मिस्कान याने १०-१२ वर्षे वयोगटात द्वितीय, अद्विक धर्माडे याने १२-१४ वर्षे या वयोगटात द्वितीय, अनुराग भुयार याने देखील १२-१४ वर्षे वयोगटात द्वितीय क्रमांक पटकावला. १३ रोजी सायंकाळी स्थानिक गांधी चौकात खेळाडूंचा सत्कार करण्यात आला. यावेळी उपनगराध्यक्ष व शिक्षण सभापती गौरव जाजू, पाणीपुरवठा सभापती अजय कटकमवार, नगरसेवक सुनील बाजपेयी, राहुल गोडबोले, प्रकाश गुल्हाने, देवा साठे उपस्थित होते. मान्यवरांच्या हस्ते खेळाडू व प्रशिक्षक मो. सलीम शेख यांचा सत्कार करण्यात आला. खेळाडूंनी यशाचे श्रेय प्रशिक्षक तथा थायबॉसिंग असोसिएशनचे सचिव मो. सलीम, अध्यक्ष संग्राम मोहिते, उपाध्यक्ष नरेश वडनारे, सहसचिव मोहिन शेख आणि पालकांना दिले.