बंगाल विधानसभेच्या अध्यक्षपदी रथींद्र बोस!

    दिनांक :14-May-2026
Total Views |
कोलकाता,
athindra Bose Appointed Speaker of Bengal पश्चिम बंगालमध्ये सत्तांतरानंतर नव्या सरकारची घडी बसवण्याचे काम वेगाने सुरू आहे. भाजप नेते शुभेंदू अधिकारी यांनी मुख्यमंत्रीपदाची सूत्रे हाती घेतल्यानंतर आता विधानसभा कामकाजासाठीही महत्त्वाचे निर्णय घेतले जात आहेत. राज्यात भाजप सरकार स्थापन झाल्यानंतर मंत्रिमंडळाची घोषणा करण्यात आली असून, प्रशासन अधिक प्रभावीपणे चालवण्यासाठी ४२ मंत्र्यांचा समावेश करण्यात आला आहे. यामध्ये २४ कॅबिनेट मंत्री आणि १८ राज्यमंत्र्यांचा समावेश आहे. दरम्यान, १८ व्या पश्चिम बंगाल विधानसभेच्या अध्यक्षपदासाठी भाजपने रथींद्र बोस यांचे नाव पुढे केले आहे. कूचबिहार दक्षिण मतदारसंघातून निवडून आलेले रथींद्र बोस हे पहिल्यांदाच आमदार बनले आहेत. पहिल्याच कार्यकाळात त्यांच्यावर विधानसभा अध्यक्षपदाची जबाबदारी सोपवण्यात आल्याने राजकीय वर्तुळात त्यांची जोरदार चर्चा सुरू झाली आहे.

Bengal 
 
रथींद्र बोस यांची ओळख केवळ राजकारणी म्हणून नाही, तर ते व्यवसायाने चार्टर्ड अकाउंटंट असल्याने त्यांची प्रशासन आणि आर्थिक विषयांवरील पकड मजबूत मानली जाते. राजकारणात सक्रिय होण्यापूर्वी त्यांनी आर्थिक सल्लागार आणि सीए म्हणून काम केले असून, आजही ते त्या क्षेत्राशी संबंधित असल्याची माहिती समोर आली आहे. भाजपकडून विधानसभा अध्यक्षपदासाठी नव्या आणि व्यावसायिक पार्श्वभूमी असलेल्या चेहऱ्याला संधी दिल्याने पक्षाने प्रशासनिक पारदर्शकता आणि प्रभावी कामकाजावर भर दिल्याचे मानले जात आहे. आता रथींद्र बोस यांच्याकडे विधानसभा कामकाज सुरळीत आणि नियमबद्ध पद्धतीने चालवण्याची मोठी जबाबदारी असणार आहे.