- 26 लाखांचे बाेगस बियाणे आढळले
अनिल कांबळे
नागपूर,
Bogus BT Cotton Seeds Seized पावसाळा जवळ आला की बाेगस बियाण्यांची विक्री सुरु हाेते. तसेच शेतकऱ्यांची फसवणूक करण्यासाठी बनावट किटकनाशक आणि खतेसुद्धा बाजारात येतात. शेतकऱ्यांची फसवणूक करण्याच्या उद्देशाने विनापरवाना आणि संशयास्पद बीटी कापूस बियाण्यांची अवैध वाहतूक व साठवणूक करणाऱ्या रॅकेटचा पर्दााश करण्यात आला आहे. धाडीदरम्यान 26 लाखांहून अधिक किमतीचे बियाणे जप्त केले. लकडगंज पाेलीस ठाण्याच्या हद्दीत ही घटना घडली.
प्राप्त माहितीनुसार, 13 मे राेजी गाेपनीय माहितीच्या आधारे नागपुरातील ऑक्ट्राॅय ्री झाेन परिसरातील गाेडाऊन क्रमांक 22/2 येथे छापा टाकण्यात आला. तेथे एमएच-40-एके-3993 क्रमांकाचा ट्रक उभा हाेता. या ट्रकमध्ये संशयास्पद बीटी कापूस बियाण्यांच्या 58 प्लास्टिक बॅग्स आढळून आल्या. त्यापैकी काही बॅग्स गाेडाऊनमध्ये उतरविण्याचे काम सुरू असल्याचे तपासात स्पष्ट झाले. त्या बॅगांमध्ये सुकून-15 बीजी-2 हे कापूस बियाणे आढळून आले. बियाण्यांच्या प्रत्येक बॅगेत 475 ग्रॅम वजनाची 50 पाकिटे हाेती. एकूण 2,907 पाकिटे जप्त करण्यात आली. ती बियाणे गुजरातमधील कंपन्यांनी उत्पादित व बाजारात आणल्याचे नमूद करण्यात आले हाेते.
Bogus BT Cotton Seeds Seized कारवाईत जप्त करण्यात आलेल्या बियाण्यांची किंमत 26 लाख 19 हजार 207 रुपये इतकी असून वाहतुकीसाठी वापरण्यात आलेला ट्रक असा एकूण 51 लाख 19 हजार 207 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. या प्रकरणात गुजरातमधील सुकून सीड्स प्रा.लि. या कंपनीचे नाव समाेर आले आहे. तसेच डिलिव्हरी चलनावरून अमरावती येथील विक्रमभाई चाैधरी उफर् विक्रम जाट यांचेही नाव निष्पन्न झाले आहे. संबंधित कंपनीकडे महाराष्ट्रात बियाणे विक्रीचा वैध परवाना नसताना कापूस बियाण्यांची वाहतूक, साठवणूक आणि विक्री सुरू हाेती. तसेच बियाण्यांच्या लेबलिंगमध्येही अनेक नियमांचे उल्लंघन झाल्याचे निदर्शनास आले. या बियाण्यांद्वारे शेतकèयांची दिशाभूल करून आर्थिक फायद्यासाठी फसवणूक करण्याचा प्रयत्न सुरू हाेता. कृषी अधिकारी रिना संदीप डाेंगरे यांच्या तक्रारीनुसार आराेपींविराेधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.