नागपूर,
Chhatrapati Sambhaji Maharaj पराक्रम आणि अदम्य साहसाचे प्रतीक’ असलेले स्वराज्यरक्षक छत्रपती संभाजी महाराज यांच्या जयंतीनिमित्त महावितरणच्या वतीने काटोल रोड येथील विद्युत भवन’ या मुख्य कार्यालयात त्यांना विनम्र अभिवादन करण्यात आले. याप्रसंगी शंभूराजांच्या देदीप्यमान इतिहासाला उजाळा देण्यात आला. कार्यक्रमाच्या सुरुवातीला महावितरणचे अधीक्षक अभियंता मंगेश वैद्य आणि सहायक महाव्यवस्थापक जाधव यांनी छत्रपती संभाजी महाराज यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून वंदन केले.
Chhatrapati Sambhaji Maharaj यावेळी महावितरणचे वरिष्ठ अधिकारी, अभियंता आणि कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते. शिवपुत्र शंभूराजांच्या शौर्याचे त्यांच्या धोरणी राज्यकारभाराचे स्मरण यावेळी करण्यात आले. याप्रसंगी उपव्यवस्थापक अमित पेठेकर यांनी संभाजी महाराजांच्या जीवनपटावर आधारित प्रेरणादायी माहिती उपस्थितांना दिली. प्रतिकूल परिस्थितीत स्वराज्य अबाधित राखण्यासाठी दिलेला लढा आणि त्यांचे संस्कृत भाषेवरील प्रभुत्व यावर त्यांनी प्रकाश टाकला. महावितरणच्या सर्व स्तरातील अधिकारी व कर्मचार्यांनी अतिशय उत्साहात या कार्यक्रमात सहभाग नोंदवला.