एका 15 वर्षीय अल्पवयीन मुलीचा Child Marriage बालविवाह राेखण्यात प्रशासनाला यश आले असून चाईल्ड हेल्पलाईन 1098 वर प्राप्त झालेल्या तक्रारीच्या आधारे ही कारवाई करण्यात आली. बालविवाहातील मुलगी ही वडधामना येथील असून तिचा विवाह गाेंदिया जिल्ह्यातील रहिवासी 24 वर्षीय युवकासाेबत लावण्यात येणार असल्याची माहिती जिल्हा बाल संरक्षण अधिकारी मुस्ताक पठाण यांना मिळाली हाेती. त्यानंतर लग्नाच्या सहा दिवसांपूर्वीच छापा घालून ही कारवाई करण्यात आली.
17 वर्षांच्या मुलीचे आईवडिलांनी नातेवाईक असलेल्या तरुणाशी ठरविला. त्या मुलीला शिक्षण घ्यायचे हाेते. मात्र, तिच्या इच्छेविरुद्ध हा विवाह आईवडिल लावून देणार हाेते. ही बाब चाईल्ड लाईन आणि जिल्हा महिला व बालविकास कार्यालयाच्या अधिकाèयांपर्यंत पाेहचली. प्रकरणाची गंभीरता लक्षात घेता चाईल्ड हेल्पलाईन, जिल्हा बाल संरक्षण यंत्रणा तसेच संबंधित सामाजिक संस्थांनी तात्काळ हालचाल करत मुलाच्या राहत्या घरी भेट दिली. या दरम्यान संबंधित कुटुंबीयांशी सविस्तर संवाद साधण्यात आला. बालविवाह प्रतिबंधक कायदा 2006 अंतर्गत बालविवाह हा दंडनीय गुन्हा असल्याची माहिती देत त्याचे कायदेशीर परिणाम स्पष्ट करण्यात आले. तसेच अल्पवयीन मुलींच्या शिक्षण, आराेग्य, मानसिक विकास आणि सुरक्षिततेवर हाेणारे दुष्परिणाम समजावून सांगत कुटुंबीयांचे समुपदेशन करण्यात आले.
Child Marriage समुपदेशन आणि प्रतिबंधात्मक हस्तक्षेपामुळे संबंधित कुटुंबीयांनी विवाह स्थगित करण्यास सहमती दर्शवली. त्यामुळे एका अल्पवयीन मुलीचे बालपण, शिक्षण आणि भवितव्य सुरक्षित करण्यात प्रशासनाला यश आले. मुलीच्या सुरक्षिततेसाठी तसेच तिच्या पुढील शिक्षण आणि पुनर्वसनाच्या दृष्टीने आवश्यक ती पुढील कार्यवाही सुरू करण्यात आली आहे. सदर कारवाई ही जिल्हा महिला व बालविकास अधिकारी सुनील मेसरे यांच्या मार्गदर्शनाखाली या माेहिमेत चाईल्ड हेल्पलाईन प्रतिनिधी अनिकेत भिवगडे, मीनाक्षी धडाडे, प्रियंका हाेटे तसेच ग्रामीण समस्या मुक्ती ट्रस्टच्या पारामीता गजभिये आणि रूपाली वानखेडे यांनी सहभाग घेतला.