भंडारा मार्गावर वातानुकूलित ई-बसची विनाकंडक्टर सेवा सुरू

    दिनांक :14-May-2026
Total Views |
नागपूर,
Conductor-less E-Bus Service महाराष्ट्र मार्ग परिवहन महामंडळाच्या नागपूर विभागातर्फे नागपूर-भंडारा मार्गावर १२ मीटर वातानुकूलित ई-बसची विनाकंडक्टर सुरू करण्यात आली आहे. ही परिवहन सेवा नागपूर ते भंडारा १६ फेर्‍यांमध्ये तसेच भंडारा ते नागपूर १२ फेर्‍यांमध्ये अशा एकूण २८ फेर्‍यांमध्ये चालविण्यात येणार आहे.
 
 
E-Bus
 
या मार्गावर दररोज मोठ्या प्रमाणात विद्यार्थी, नोकरदार नागरिक, ज्येष्ठ नागरिक तसेच विविध कामांसाठी प्रवास करणार्‍या प्रवाशांची संख्या अधिक असते. विनाकंडक्टर वातानुकूलित ई-बस सेवा सुरू प्रवाशांचा वेळ वाचणार असून प्रवास अधिक सुविधाजनक आणि सुलभ होणार आहे.
 
 
Conductor-less E-Bus Service  एसटी महामंडळाकडून मिळालेल्या माहितीनुसार नागपूर ते भंडारा जाणार्‍या बसच्य वेळा सकाळी ६.००, ६.३०, ७.००, ७.३०, ८.००, ८.३०, ८.४५, ९.००, ९.३०, १०.००, १०.१५, १०.४५, ११.१५, ११.४५, १२.००, १२.३०, १४.००, १४.३०, १५.००, १५.३०, १५.४५, १६.००, १७.००, १७.३०, १८.३०, २०.०० आणि अशा राहतील. त्याचप्रमाणे भंडारा ते नागपूर येणार्‍या बसच्या वेळा सकाळी ६.३०, ७.००, ७.३०, ८.००, ८.३०, ८.४५, ९.१५, ९.३०, १०.१५, १०.४५, ११.१५, ११.४५, १२.००, १२.३०, १३.००, १३.३०, १४.००, १५.००, १५.३०, १६.००, १६.३०, १७.००, १७.३०, १७.४५, १८.००, १८.३०, १९.०० १९.१५ अशा राहतील. महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाच्या नागपूर विभागाने प्रवाशांना या ई-बस सेवेचा लाभ घेण्याचे आवाहन केले आहे.