*परळी-अंबाजोगाई मार्गावरील घटना
सेलू,
Death of a Police Employee जनतेच्या सुरक्षेसाठी दिवसरात्र झटणार्या एका कर्तव्यदक्ष पोलिस कर्मचार्याचा प्रवासातच दुर्दैवी अंत झाल्याची घटना परळी-अंबाजोगाई मार्गावर घडली. जेवणासाठी एका ढाब्यावर थांबलेल्या पोलिस कर्मचार्याच्या घशात अचानक अन्नाचा घास अडकल्याने त्यांचा जागीच मृत्यू झाला. या घटनेने पोलिस दलात हळहळ व्यत केली जात आहे.
देवेंद्र रामराज गुजर (५५) रा. आर्वी, जि. वर्धा असे मृत पोलिस कर्मचार्याचे नाव असून ते जिल्ह्याबाहेर कर्तव्य बजावण्यासाठी गेले होते. सोमवारी सायंकाळी प्रवासादरम्यान ते परळी-अंबाजोगाई मार्गावरील एका ढाब्यावर जेवण करण्यासाठी थांबले होते, अशी माहिती आहे. जेवण सुरू असतानाच अचानक घशात घास अडकल्याने त्यांना तीव‘ त्रास होऊ लागला. काही क्षणांतच त्यांची प्रकृती गंभीर झाली. ढाब्यावर उपस्थित नागरिकांनी मदतीसाठी धाव घेतली. मात्र, परिस्थितीचे गांभीर्य वाढत गेले आणि काही वेळातच त्यांचा मृत्यू झाला.
Death of a Police Employee माहिती मिळताच परळी ग्रामीण पोलिसांनी तातडीने घटनास्थळी धाव घेत पंचनामा केला. मृतदेह पुढील तपासणीसाठी उपजिल्हा रुग्णालयात हलविण्यात आला. कर्तव्यनिष्ठ आणि मनमिळावू स्वभावामुळे देवेंद्र गुजर यांची सहकार्यांमध्ये वेगळी ओळख होती. त्यांच्या अचानक जाण्याने पोलिस दलावर शोककळा पसरली असून, एका हसर्या कुटुंबाचा आधार हरपल्याची भावना व्यत होत आहे. कर्तव्य बजावत असताना काळाने घातलेला हा घाला अनेकांच्या डोळ्यांत अश्रु आणणारा ठरला आहे.