प्रिंसिपलची निवड वादात! दिल्ली विद्यापीठाने बोलावली तातडीची बैठक

    दिनांक :14-May-2026
Total Views |
नवी दिल्ली,
delhi-university : दिल्ली विद्यापीठाने सेंट स्टीफन्स कॉलेजच्या नवीन प्राचार्यांच्या नियुक्ती प्रक्रियेवर आक्षेप घेतला आहे. विद्यापीठाने कॉलेज प्रशासनाला पत्र लिहून, ही नियुक्ती प्रक्रिया पुढे न नेण्याची आणि यूजीसी विनियम २०१८ च्या तरतुदींनुसार गठीत केलेल्या निवड समितीची बैठक बोलावण्याची विनंती केली आहे.
 
 
delhi
 
 
विद्यापीठाने पाठवलेल्या पत्रात म्हटले आहे, "नवीन प्राचार्यांच्या नियुक्तीची प्रक्रिया पुढे न नेण्याची आणि यूजीसी विनियम २०१८ च्या तरतुदींनुसार गठीत केलेल्या निवड समितीची बैठक बोलावण्याची आपणास विनंती आहे."
या मुद्द्यावरून विद्यापीठ आणि कॉलेज प्रशासन यांच्यातील वाद आणखी वाढण्याची शक्यता आहे. या संपूर्ण वादासंदर्भात सेंट स्टीफन्स कॉलेजच्या कॅम्पसमध्ये विविध चर्चा सुरू आहेत.