धोकादायक खड्ड्यामुळे अपघाताचा धोका

    दिनांक :14-May-2026
Total Views |
चंदनवाडी चौकात गतिरोधकांची मागणी
 
कारंजा लाड, 
Demand for Speed ​​Breakers शहरातील चंदनवाडी चौक तसेच सिंधी कॉलनी परिसरातील रस्त्यावर सहा महिन्यांपूर्वी जुने मोठे गतिरोधक हटविण्यात आले. मात्र त्यानंतर संबंधित विभागाकडून नवीन गतिरोधकांची उभारणी करण्यात आलेली नसल्याने या ठिकाणी मोठे खड्डे निर्माण झाले असून वाहनचालकांसह विद्यार्थ्यांच्या सुरक्षिततेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे.
 
 
Speed ​​Breakers
 
या मार्गावरून दररोज शाळा व महाविद्यालयातील विद्यार्थी मोठ्या संख्येने ये-जा करतात. तसेच शहरातील महत्त्वाचा मार्ग असल्याने दुचाकी, चारचाकी आणि इतर वाहनांची सतत वर्दळ असते. जुन्या गतिरोधकांचे खोदकाम करून रस्त्यावर लांबच लांब खड्डे तयार झाल्यामुळे वाहनचालकांना अचानक ब्रेक लावावे लागत आहेत. विशेषतः रात्रीच्या वेळी किंवा पावसाळ्यात हे खड्डे स्पष्टपणे दिसत नसल्याने अपघाताची शयता अधिक वाढली आहे.स्थानिक नागरिकांच्या मते, संबंधित विभागाने मोठे गतिरोधक हटविल्यानंतर तातडीने नियोजनबद्ध पद्धतीने लहान गतिरोधक उभारणे अपेक्षित होते. मात्र गेल्या सहा महिन्यांपासून या प्रश्नाकडे दुर्लक्ष होत असल्याने नागरिकांमध्ये नाराजी व्यक्त होत आहे. अनेक वाहनचालकांना या ठिकाणी वाहनांचे नुकसान सहन करावे लागत असून, विद्यार्थ्यांच्या सुरक्षिततेबाबतही पालकांमध्ये चिंता वाढली आहे.
 
 
Demand for Speed ​​Breakers  चंदनवाडी चौक आणि सिंधी कॉलनी परिसरातील रस्त्यावर तातडीने छोटे गतिरोधक उभारणे आवश्यक आहे. अन्यथा येथे कधीही गंभीर अपघात घडू शकतो.दरम्यान, संबंधित सार्वजनिक बांधकाम विभागाने या समस्येची तातडीने दखल घेऊन रस्त्याची दुरुस्ती व सुरक्षित गतिरोधकांची उभारणी करावी, अशी मागणी नागरिकांकडून होत आहे.