मुंबई,
Dhurandhar 2 Dominates the Box Office 'धुरंधर २' हा चित्रपट प्रदर्शित होऊन जवळपास दोन महिने पूर्ण झाले असले तरी त्याची बॉक्स ऑफिसवरील घोडदौड अद्याप कायम आहे.रणवीर सिंग अभिनित आणि आदित्य धर दिग्दर्शित या स्पाय ड्रामाने कमाईचे नवे विक्रम रचण्यास सुरुवात केली आहे. चित्रपट लवकरच ओटीटी प्लॅटफॉर्मवर झळकणार असला तरी थिएटरमध्ये प्रेक्षकांचा प्रतिसाद अजूनही कायम असल्याचे दिसून येत आहे.प्रदर्शनाच्या ५६ व्या दिवशी चित्रपटाने भारतीय बॉक्स ऑफिसवर आणखी ₹०.३७ कोटींची कमाई केली. त्यामुळे भारतातील या चित्रपटाचे एकूण नेट कलेक्शन ₹११४४.२१ कोटींवर पोहोचले आहे, तर ग्रॉस कलेक्शन ₹१३६९.४२ कोटींवर गेले आहे. परदेशातही चित्रपटाची कमाई सुरू असून ५६ व्या दिवशी त्याने ₹०.०३ कोटींची भर घातली. यानंतर चित्रपटाचे एकूण परदेशी कलेक्शन ₹४२६.६५ कोटींवर पोहोचले आहे.देशांतर्गत आणि परदेशातील कमाई मिळून ‘धुरंधर २’चे जागतिक कलेक्शन आता तब्बल ₹१७९६.०७ कोटींवर पोहोचले आहे. त्यामुळे १८०० कोटींच्या ऐतिहासिक क्लबमध्ये प्रवेश करण्यासाठी चित्रपटाला आता फक्त ₹४ कोटींची आवश्यकता आहे. हा टप्पा गाठल्यास Dangal नंतर १८०० कोटींच्या क्लबमध्ये पोहोचणारा हा दुसरा भारतीय चित्रपट ठरणार आहे.