पेट्रोल पंपावर डिझेल मिळत नसल्याने शेती मशागतीची कामे खोळंबली
दिनांक :14-May-2026
Total Views |
राळेगाव,
Diesel Shortage तालुक्यात सध्या मान्सूनपूर्व शेती मशागतीच्या कामांना वेग आला असून शेती मशागतीची कामे ट्रॅक्टरच्या सहाय्याने मोठ्या प्रमाणात केली जात आहे. परंतु तालुक्यासह परिसरात निर्माण झालेल्या डिझेल टंचाईमुळे शेतकरी, वाहनधारक आणि व्यापारी वर्ग अक्षरशः हैराण झाला असून, डिझेल मिळवण्यासाठी पेट्रोल खर्च’ करण्याची वेळ नागरिकांवर आली आहे.
पेट्रोल पंपावर डिझेलचा पुरेसा साठा उपलब्ध नसल्याने पेट्रोल पंप चालक कॅन मध्ये डिझेल भरून देत नसून पंपावर ट्रॅक्टर बोलवला जात आहे मात्र पंधरा ते वीस किलोमीटर वरून ट्रॅक्टर आणणे परवडत नसल्याने किंवा ट्रॅक्टर मधील डिझेल संपल्यास ट्रॅक्टर पंपावर आणणे शक्य होत नाही त्यामुळे ट्रॅक्टर चालक किंवा मालक हे पेट्रोल पंपावर कॅन घेऊन डिझेल साठी जात असताना पेट्रोल पंप चालक पेट्रोल देण्यास नकार देत असल्याने शेतकèयांची शेती मशागतीची कामे खोळंबली आहे. संबंधित विभागाने शेती मशागतीच्या कामांकरिता ट्रॅक्टर साठी डिझेल उपलब्ध करून देण्यात यावे अशी मागणी शेतकरी बांधवाकडून केली जात आहे.
Diesel Shortage मागील काही दिवसांपासून अनेक पेट्रोलपंपांवर डिझेल उपलब्ध नसल्याने डिझेल उपलब्ध नाही, असे फलक लावले आहेत. त्यामुळे वाहनधारकांना रिकाम्या हाताने परत जावे लागत आहे. काही ठिकाणी डिझेल मिळेल, या अपेक्षेने सकाळपासून रात्रीपर्यंत शेतकरी, ट्रॅक्टरचालक आणि पिकअप वाहनधारक रांगेत उभे राहत आहेत. तालुक्यात एखाद्या पंपावर डिझेल आले की मोठी गर्दी होऊन रांगा लागत आहेत त्यातही पुरेसे डिझल मिळत नाही.