कारंज्यात मोफत हेल्मेटचा गारवा

    दिनांक :14-May-2026
Total Views |
पोलीस निरीक्षक प्रल्हाद मदन यांचा उपक्रम
 
कारंजा (घा.), 
Distribution of Free Helmets शहरात वाढत्या अपघातांच्या पृष्ठभूमीवर कारंजा पोलिस स्टेशनतर्फे ठाणेदार प्रल्हाद मदन यांच्या मार्गदर्शनाखाली मोफत हेल्मेट वाटपाचा अभिनव उपक्रम राबविण्यात आला. शहर तसेच ग्रामीण भागातील दुचाकी वाहन चालकांना तब्बल १०० हेल्मेटचे वाटप करण्यात आले. तसेच नागरिकांना वाहतूक नियमांचे पालन करण्याबाबत सविस्तर मार्गदर्शन करण्यात आले. वाहन चालविताना हेल्मेटचा अनिवार्य वापर करणे, वाहनाची सर्व कागदपत्रे सोबत ठेवणे, विना नंबरची वाहने रस्त्यावर आणू नयेत, अल्पवयीन मुलांच्या ताब्यात मोटारसायकल देऊ नये, ओव्हरस्पीड वाहन चालवू नये तसेच दारू पिऊन वाहन चालविणे टाळावे अशा महत्त्वपूर्ण सूचनांद्वारे नागरिकांना जागृत करण्यात आले. वाहतूक नियमांचे पालन केल्यास अनेक अपघात टाळता येऊ शकतात, असा संदेश दिला.
 
 
helmet
 
Distribution of Free Helmets  प्रल्हाद मदन यांनी ठाणेदार म्हणून पदभार स्वीकारल्यापासून त्यांनी केवळ कायदा व सुव्यवस्था राखण्यापुरते मर्यादित न राहता विविध सामाजिक उपक्रमांद्वारे पोलिस आणि सामान्य जनता यांच्यात विश्वासाचे नाते निर्माण केले. पोलिस विभागाने नागरिकांशी मैत्रीपूर्ण संवाद वाढवून पोलिस जनतेचे खरे रक्षक आहेत ही भावना अधिक दृढ केली आहे. जनतेच्या सुरक्षिततेला प्राधान्य देत पोलिस प्रशासनाने घेतलेला हा उपक्रम अपघात रोखण्यासाठी  आणि वाहतूक शिस्त निर्माण करण्यासाठी प्रेरणादायी ठरत आहे.