मेडिकलमधील डाॅक्टरांमध्ये हाणामारी

    दिनांक :14-May-2026
Total Views |
- पाच डाॅक्टरांची वसतिगृहातून हकालपट्टी

अनिल कांबळे
नागपूर,
Doctors at Medical College  मेडिकलमधील काही डाॅक्टरामध्ये माेबाईलच्या चार्जरवरुन झालेल्या वादानंतर आपसांत हाणामारी झाली. डाॅक्टरांमध्ये झालेल्या या प्रकाराची गंभीर दखल घेत मेडिकल प्रशासनाने पाच डाॅक्टरांना कारणे दाखवा नाेटीस बजावत एक महिन्यासाठी वसतिगृहातून हकालपट्टी केली आहे. तसेच त्या डाॅक्टरांचे एका महिन्याचे विद्यावेतन कापण्याचा प्रस्तावही पाठविण्यात आला आहे.
 
 
doc
 
Doctors at Medical College  10 मे राेजी सायंकाळी सात वाजता डाॅ. वैभव चाैधरी हे एका रुग्णाचा सीटी स्कॅन काढण्यासाठी रेडिओलाॅजी विभागात गेले हाेते. संबंधित रुग्णाचा अहवाल तातडीने न्युराेसर्जनला दाखवायचा असल्याने ते घाईत हाेते. मात्र, त्यांचा माेबाईल डिस्चार्ज झाल्याने त्यांनी विभागातील एका कक्षात चार्जिंगला लावला. यावरून रेडिओलाॅजी विभागातील निवासी डाॅ. क्षितिज यादव यांनी आक्षेप घेतल्याने दाेघांमध्ये भांडण झाले. वाद मारहाणीपर्यंत पाेहाेचला. त्यानंतर डाॅ. चाैधरी यांनी सहकारी डाॅ. वैभव वायल, डाॅ. राज जैन आणि डाॅ. समर्प निपजकर यांना घटनेची माहिती दिली. हे चाैघे मिळून पुन्हा यादव यांच्याशी जाब विचारण्यासाठी गेले आणि तेथे पुन्हा भांडण झाले. घटनेची माहिती वैद्यकीय शिक्षण विभागापर्यंत पाेहाेचल्यानंतर मेडिकल प्रशासनाने अंतर्गत चाैकशी समिती स्थापन केली.