- पाेलिसांच्या भूमिकेवर संभ्रम!
अनिल कांबळे
नागपूर,
Downtown Hookah Parlor युवा पिढी अंमली पदार्थ आणि हुक्का पार्लरच्या नादी लागून व्यसनाधीन हाेत असल्यामुळे पाेलिस आयुक्तांनी ऑपरेशन थंडर राबवणे सुरु केले. ठाणेदारांना कडक कारवाई करण्याचे आदेश दिले. मात्र, काही ठाणेदारांनी आयुक्तांच्या आदेशाला केराची टाेपली दाखवल्याची स्थिती निर्माण झाली आहे. शहरातील मध्यभागी असलेल्या सदर पाेलिस ठाण्याच्या हद्दीतील डाऊनटाऊन हुक्का पार्लरवर पाेलिसांनी धाड टाकली व तेथील मालकासह 11 जणांविराेधात गुन्हा दाखल केला. संबंधित हुक्का पार्लरवर तीन महिन्यांत तिसऱ्यांदा धाड टाकण्यात आली आहे.
Downtown Hookah Parlor पाेलिस आयुक्त डाॅ. रविंद्रकुमार सिंगल आणि सहआयुक्त नवीनचंद्र रेड्डी यांनी सकारात्मक भूमिका घेत शहरातील अवैध धंद्यांवर ‘सर्जिकल स्ट्राईक’ केला आहे. त्यामुळे अवैध धंदे चालविणाऱ्यांमध्ये आयुक्तांची दहशत निर्माण झाली आहे. मात्र, ठाणेदार आणि पाेलिस ठाण्यातील कर्मचारी आयुक्तांच्या आदेशाला जुमानत नसल्याचे चित्र आहे. बुधवारी रात्री साडेआठ वाजताच्या सुमारास माऊंट राेड येथील डाऊनटाऊन हुक्का पार्लरवर धाड टाकण्यात आली. त्यावेळी तेथे अनेक ग्राहक हुक्का ओढत बसले हाेते. पाेलिसांकडून तेथील मालक गाैरव श्रीराम बाेकडे (33, दुर्गानगर बॅंक काॅलनी, अजनी), तेथील कर्मचारी परेश धनराज साेनटक्के (20, इतवारी, निकालसमंदिराजवळ) यांच्यासह ग्राहक मनिष देवानंद पाठराबे (24, नवीन मंगळवारी), अभिषेक प्रवीण माेहाडीकर (21, कांजी हाऊस, नवीन मंगळवारी), गाैरव सचिन पाटील (20, बिनाकी मंगळवारी), शशांक निखारे (27, बांग्लादेश, लालगंज), साहील कृष्णराव वेळेकर (23, तांडापेठ), सलमान कुरेशी उर्फ ईस्लाम कुरेशी (28, हबीबनगर, टेका), गुरप्रीतसिंग अनाेकसिंग सरगाेत्रे (29, भिलगाव), माेहम्मद कादीर माेहम्मद वकील खान (34, दिवानशहा तकिया, माेमीनपुरा), अशरफ काजी उफर् जसीम काजी (26, गांधीबाग) यांच्याविराेधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
गुन्हे शाखेची पथके करतात तरी काय ?
पाेलिस ठाण्यातील डीबी पथके आणि खुिफया विभागाचे अवैध धंदेवाल्यांशी ‘अर्थपूर्ण’ संबंध असतात. त्यामुळे अवैध धंद्यांवर स्थानिक ठाण्यातील पाेलिस कारवाई करीत नाहीत. त्यामुळे शहरातील अवैध धंद्यांवर नियंत्रण ठेवण्याची मुख्य जबाबदारी गुन्हे शाखेच्या पथकांवर आहे. मात्र, गेल्या काही महिन्यांत प्रत्येक पथकात ‘कलेक्टर’ नेमला असून त्याला ‘टार्गेट’ देण्यात येत आहे. त्यामुळे गुन्हे शाखेची पथके केवळ वसुली करण्यासाठीच आहेत का?, अशी चर्चा सुरु झाली आहे.