पाेलिस हवालदाराला कारच्या बाेनटवरुन नेले फरफटत

    दिनांक :14-May-2026
Total Views |
- पाेलिस कर्मचारी जखमी : कारचालकावर गुन्हा दाखल
अनिल कांबळे
 
नागपूर, 
Dragging a police constable भांडेप्लाॅट चाैकातील विशाल मेगा मार्टसमाेर नाकाबंदी दरम्यान वाहतूक पाेलिसाने एका संशयित कारचालकाला थांबण्याचा इशारा केला. मात्र, त्या कारचालकाने पाेलिस हवालदाराला धडक दिली. ताे हवालदार कारच्या बाेनटला अडकला. चालकाने हवालदाराला जवळपास 250 मीटरपर्यंत फरफटत नेले. ही जीवघेणा हल्ला झाल्याची धक्कादायक घटना गुरुवारी समाेर आली आहे. जखमी पाेलिस कर्मचारी हर्षल इंदल वासनिक या पाेलिस हवालदारावर उपचार सुरू असून आराेपीला पाेलिसांनी अटक केली आहे. प्रसन्नजीत रामटेके ( रा. बहादुरा) असे आराेपीचे नाव आहे. आराेपी एका सेवानिवृृत्त वरिष्ठ पाेलिस अधिकाऱ्याचा मुलगा असल्याची माहिती समाेर आली आहे.
 
 
fir
 
Dragging a police constable  मिळालेल्या माहितीनुसार, ही घटना गुरुवारी मध्यरात्री साडेअकरा ते पावणे बारा वाजण्याच्या सुमारास घडली. सक्करदरा पाेलिस ठाण्याच्या हद्दीतील भांडे प्लाॅट चाैक परिसरात वाहतूक पाेलिसांची नाकाबंदी सुरू हाेती. त्यावेळी एमएच-49 बीके-6212 क्रमांकाच्या पांढऱ्या रंगाच्या हाेंडा सिटी कारला थांबण्याचा इशारा देण्यात आला. मात्र, चालकाने वाहन न थांबवता भरधाव वेगात कार पुढे दामटली आणि वाहतूक शाखेतील पाेलिस हवालदार हर्षद इंदल वासनिक यांना धडक दिली. धडकेनंतर आराेपी चालकाने पाेलिस कर्मचाऱ्याला कारच्या बाेनटवर सुमारे 250 मीटरपर्यंत फरफटत नेत गुरुदेव नगर राेडच्या दिशेने पलायन केले. या घटनेत हवालदार वासनिक यांच्या पायाला फॅक्चर झाले असून त्यांच्यावर खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत.
सीसीटीव्हीवरुन आराेपीचा शाेध
घटनेनंतर पाेलिसांनी सीसीटीव्ही फुटेज आणि वाहन क्रमांकाच्या आधारे आराेपीचा शाेध घेत त्याला अटक केली. अटक करण्यात आलेल्या आराेपीची ओळख प्रसन्नजीत रामटेके अशी झाली आहे. या प्रकरणी पाेलिसांनी आराेपीविराेधात खुनाच्या प्रयत्नासह विविध गंभीर कलमांखाली गुन्हा दाखल केला असून पुढील तपास सुरू आहे. दरम्यान, सलग दुसèया दिवशी पाेलिस कर्मचाèयावर झालेल्या हल्ल्यामुळे शहरातील कायदा-सुव्यवस्था आणि वाहतूक पाेलिसांच्या सुरक्षेचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला आहे. वाहतूक पाेलिसांवर वारंवार हाेणारे हल्ले चिंतेचा विषय ठरला आहे.