कृषी योजनांसाठी ‘फार्मर आयडी’ काढावे

    दिनांक :14-May-2026
Total Views |
जिल्हाधिकारी विकास मीना यांचे आवाहन
अन्यथा पीएम किसान सन्मान निधीपासून वंचित

यवतमाळ, 
'Farmer ID' प्रधानमंत्री किसान सन्मान निधी पीएम किसान योजनेअंतर्गत यवतमाळ जिल्ह्यातील ज्या लाभार्थ्यांनी अद्याप ‘फार्मर आयडी’ काढलेला नाही, त्यांनी 20 मे पूर्वी ही प्रक्रिया पूर्ण करणे अनिवार्य असल्याचे कृषी विभागाकडून स्पष्ट करण्यात आले आहे. विहित मुदतीत फार्मर आयडी न काढल्यास भविष्यात कृषी विभागाच्या विविध योजनांच्या लाभापासून वंचित राहण्याची शक्यता असल्याचे आवाहन जिल्हाधिकारी विकास मीना, तसेच जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी मनोज ढगे यांनी केले आहे. केंद्र शासनाच्या ‘अ‍ॅग्रीस्टॅक’ अंतर्गत राज्यातील सर्व शेतकèयांची डिजिटल नोंदणी करण्यात येत आहे. जिल्ह्यातील सद्यस्थितीनुसार पीएम-किसान योजनेचे एकूण 2 लाख 95 हजार 183 लाभार्थी असून, त्यापैकी 2 लाख 62 हजार 11 शेतकèयांकडे फार्मर आयडी आहे. मात्र, 33 हजार 172 लाभार्थ्यांचे प्रलंबित आहेत.
 
 
 
'Farmer ID'  15 एप्रिल 2025 पासून कृषी विभागाच्या विविध योजनांचा लाभ घेण्यासाठी फार्मर आयडी अनिवार्य करण्यात आला आहे. फार्मर आयडी तयार झाल्यानंतर पीएम-किसान पोर्टलवरील ई-केवायसी व लँड सिडिंग प्रक्रिया स्वयंचलितपणे अद्ययावत होण्यास मदत होते. यामुळे लाभार्थ्यांची माहिती अचूक राहून योजनांचा लाभ सुरळीत मिळतो. तसेच शेतकèयांची ओळख, जमीन व पिकांची माहिती एकाच डिजिटल प्लॅटफॉर्मवर उपलब्ध झाल्यामुळे सेवा अधिक जलद व पारदर्शक पद्धतीने मिळते. केंद्र शासनाने 20 मे ही अंतिम मुदत निश्चित केली असून, जिल्हास्तरावर या मोहिमेचे दररोज सनियंत्रण करण्यात येत आहे.जिल्ह्यातील प्रलंबित 33 हजारांहून अधिक शेतकèयांनी आपल्या क्षेत्रातील सहायक कृषी अधिकारी, उपकृषी अधिकारी किंवा संबंधित कृषी कार्यालयाशी संपर्क साधून तातडीने फार्मर आयडी काढून घ्यावा.नोंदणीसाठी आधार, आधारशी संलग्न मोबाईल क्रमांक व सातबारा उतारा घेऊन जवळच्या केंद्रावर जाऊन प्रक्रिया पूर्ण करावी. याबाबत गावपातळीवर जनजागृती करण्याच्या सूचना देण्यात आल्या असून, सर्व पात्र शेतकèयांनी या मोहिमेला प्रतिसाद द्यावा, असे आवाहन कृषी विभागाने केले आहे.

33 हजार 172 शेतकरी
जिल्ह्यातील विविध तालुक्यांमध्ये अजूनही मोठ्या संख्येने फार्मर आयडी प्रलंबित आहेत. आर्णी 1690, बाभुळगाव 1648, दारव्हा 3265, दिग्रस 2078, घाटंजी 2094, कळंब 1552, केळापूर 2098, महागाव 2108, मारेगाव 1516, नेर 1594, पुसद 3898, राळेगाव 1444, उमरखेड 2757, वणी 1768, यवतमाळ 2211 व झरी-जामणी 1451 या तालुक्यांमधील एकूण 33 हजार 172 शेतकèयांनी अद्याप फार्मर आयडी काढलेले नाहीत, अशा शेतकèयांनी आपले फार्मर आयडी 20 मे पूर्वी काढण्याचे आवाहन करण्यात आले आहे.