बाटलीबंद पाणी व थंड पेयांसह लाखोंचा माल खाक
फुलसावंगी,
Fire at a warehouse in Phulsawangi ढाणकी मार्गावरील एका थंड पेय (कोल्ड्रिंक) व पानटपरीच्या गोदामाला बुधवार, 13 मे रोजी दुपारी 12.30 च्या दरम्यान अचानक आग लागली. गोदामातून धुराचे मोठमोठे लोट निघू लागल्याने परिसरात एकच खळबळ उडाली. घटनास्थळ हे वर्दळीच्या ठिकाणी असल्याने नागरिकांनी तत्काळ धाव घेत आग आटोक्यात आणण्याचा प्रयत्न केला. दरम्यान, फुलसावंगीचे तलाठी विनोद ढोणे यांनी घटनास्थळी भेट देत महसूल प्रशासनाला माहिती दिली. उमरखेडहून अग्निशमन दलाला पाचारण करण्यात आले.
Fire at a warehouse in Phulsawangi हे गोदाम जफरखान मेहबूबखान यांनी भाडेतत्त्वावर घेतले होते. गोदामात ठेवण्यात आलेले फ्रीज, इन्व्हर्टर, पाण्याच्या बाटल्या, विविध थंडपेय, तसेच इतर साहित्य आगीत जळून खाक झाले. या आगीत लाखो रुपयांचे नुकसान झाल्याचा प्राथमिक अंदाज आहे. नागरिकांनी वेळीच धाव घेत आग नियंत्रणात आणल्याने मोठा अनर्थ टळला. सुदैवाने या घटनेत जीवितहानी झाली नाही. मात्र आगीचे कारण अद्याप स्पष्ट झाले नसून पुढील तपास सुरू आहे.