कंटेनरला भीषण आग; २ तासानंतर परिस्थितीवर नियंत्रण

    दिनांक :14-May-2026
Total Views |
*राष्ट्रीय महामार्गावरील घटना
 
हिंगणघाट, 
Fire in a container येथील राष्ट्रीय महामार्गावरील सगुना कंपनीजवळ गुरुवार १४ रोजी एका कंटेनरला अचानक भीषण आग लागली. ट्रकमधून अचानक धूर निघत असल्याचे निदर्शनास आल्यावर तातडीने कृषी उत्पन्न बाजार समिती व स्थानिक नगरपरिषदेच्या अग्निशमन विभागाला माहिती देण्यात आली. अग्निशमन दलाच्या पथकाने तातडीने घटनास्थळ गाठून २ तासानंतर परिस्थितीवर नियंत्रण मिळविले.
 
 
Fire in a container
 
Fire in a container  आगीची माहिती मिळताच हिंगणघाट नगरपालिकेचे अग्निशमन विभागाचे जवान तसेच कृषी उत्पन्न बाजार समितीच्या अग्निशमन पथकाने तात्काळ घटनास्थळ गाठले. आगीवर पाण्याचा मारा करून दोन तासाच्या प्रयत्नाअंती परिस्थितीवर नियंत्रण मिळविले. प्राथमिक माहितीनुसार, सदर ट्रक बंगळुरूहून पुढील प्रवासासाठी निघाला होता. ट्रकमध्ये विविध साहित्य मोठ्या प्रमाणात भरलेले होते. आगीत हे संपूर्ण साहित्य जळून खाक झाले. त्यामुळे लाखो रुपयांचे नुकसान झाल्याची शयता व्यत केली जात आहे.