एसटी महामंडळाच्या अधिकार्याला मनसेचे निवेदन
नागपूर,
Ganeshpeth Bus Stand मध्यवर्ती गणेशपेठ बसस्थानक परिसरातील असुविधेचा प्रवाशांना त्रास सहण करावा लागत कडक उन्हात नागरिकांना बसच्या प्रतिक्षेत राहावे लागते. बसस्थानक परिसरात कूलरची व्यवस्था नसल्याने गैरसोयींचा सामना करावा लागतो.
Ganeshpeth Bus Stand हीच बाब लक्षात घेवून महाराष्ट्र नवनिर्माण सेना, नागपूर शहरच्या वतीने एसटी महामंडळाच्या अधिकार्याला निवेदन देण्यात आले. याप्रसंगी विशाल बडगे, घनश्याम निखाडे, सचिन धोटे, शुभम तिळगुळे आदी कार्यकर्ते उपस्थित होते.