तिरोडात सहा घरगुती गॅस सिलींडर जप्त

    दिनांक :14-May-2026
Total Views |
- पुरवठा विभागाची कारवाई

गोंदिया, 
Gas Cylinder Seized घरगुती गॅस सिलिंडरचा अवैधसाठा आणि विना बुकिंग वापर होत असल्याची माहिती प्राप्त होताच तिरोडा येथील पुरवठा विभागाने मंगळवारी १२ मे रोजी तिरोडा येथील बरखा एजेन्सीज येथे धडक कारवाई करून सहा सिलिंडर जप्त केले असून गॅसचा काळाबाजार कारणार्‍या संबंधित व्यक्तीच्या विरोधात तिरोडा पोलिसात तक्रार दाखल केली आहे. गोपीचंद रामचंद वत्सानी असे एजेन्सी चालकाचे नाव आहे.
 
 
Gas Cylinder Seized
 
Gas Cylinder Seized  कारवाई दरम्यान पुरवठा विभागाने गोपीचंद वत्सानी यांच्या ताब्यातून एच.पी. कंपनीचे दोन घरगुती सिलिंडर, एक पाच किलो वजनाचा एच.पी. कंपनीचा गॅस सिलिंडर तसेच भारत गॅस कंपनीचे दोन सिलिंडर जप्त केले. याशिवाय त्यांच्या राहते घरी करण्यात आलेल्या तपासणीत व्यावसायिक वापरासाठी इंडियन कंपनीचा एक गॅस सिलिंडर विना बुकिंग आढळून आला. घरगुती गॅस सिलिंडरचा व्यावसायिक वापर तसेच नियमबाह्य साठा केल्याप्रकरणी पुरवठा विभागाने कारवाईची प्रक्रिया पूर्ण करून पुरवठा निरीक्षक दिगंबर गव्हाणे यांनी तिरोडा पोलिस ठाण्यात जत्सानी यांच्या विरोधात तक्रार नोंदवली आहे. ही कारवाई निरीक्षण अधिकारी मनोज राऊत, पुरवठा निरीक्षक दिगंबर गव्हाणे, लिपिक पंकज जनबंधू व शिपाई अश्विन वासनिक यांनी केली.
 

सद्यस्थितीत आंतरराष्ट्रीय स्तरावर इंधन संकट अधिक गडद होत आहे. अशा परिस्थितीत घरगुती गॅसचा गैरवापर, काळाबाजार किंवा अवैध साठेबाजी केल्यास कठोर कारवाई करण्यात येईल.
- प्रकाश अघावपाटील, जिल्हा पुरवठा अधिकारी, गोंदिया