खेळांच्या विकासासाठी मनपा प्रशासन

    दिनांक :14-May-2026
Total Views |
- महापौर नीता ठाकरे यांचे प्रतिपादन
- प्रशिक्षक गणेश पुरोहित भाऊ काणे स्मृती उत्कृष्ट प्रशिक्षक पुरस्काराने सन्मानित
 
नागपूर,
उपराजधानीत मोठ्या प्रमाणावर प्रतिभावान खेळाडू आहेत. त्यांना आवश्यक सर्व सोयीसुविधा दिल्या जाणार आहेत. खेळाडू व शहरातील एकूणच क्रीडा क्षेत्राचा सर्वांगीण विकास व्हावा, यासाठी मनपा प्रशासन कटिबद्ध असल्याचे, Mayor Neeta Thackeray महापौर नीता यांनी सांगितले.
 
 
bhau
 
नवमहाराष्ट्र मंडळ आणि चैतन्य स्पोर्ट्स, योगा व कल्चरल फाउंडेशनतर्फे आयोजित तिसर्‍या भाऊ काणे स्मृती उत्कृष्ट प्रशिक्षक पुरस्कार सोहळ्याप्रसंगी त्या बोलत होत्या. गांधीसागर तलाव, महाल येथील शिक्षक सहकारी बँकेच्या सभागृहात आज आयोजित या कार्यक्रमाला प्रसिद्ध अस्थिरोगतज्ञ डॉ. अनिल गोल्हर, नवमहाराष्ट्र क्रीडा मंडळाचे अध्यक्ष धनंजय काणे, सचिव प्रशांत जगताप होते. यावेळी मान्यवरांच्या हस्ते ज्येष्ठ मुष्टियुद्ध प्रशिक्षक गणेश पुरोहित यांना जीवनगौरव पुरस्कार देऊन गौरवान्वित करण्यात आले. या पुरस्कादाखल त्यांना एक लाख रुपये रोख, विशेष स्मृतीचिन्ह, शाल व श्रीफळ देण्यात आले. याशिवाय महेंद्र पाटील आणि शमशेर खान यांनाही अनुक्रमे सर्वोत्कृष्ट खो-खो आणि अ‍ॅथलेटिक्स प्रशिक्षक पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. प्रत्येकी २१ रोख व स्मृतीचिन्ह असे पुरस्कारांचे स्वरूप होते.
 
 
Mayor Neeta Thackeray  यावेळी मनोगत व्यक्त करताना पुरोहित म्हणाले, हा माझ्यासाठी आनंद व अभिमानाचा क्षण आहे. जेव्हा एका प्रशिक्षकाचा सत्कार होतो. त्यावेळी सर्व समाजाचा सत्कार होतो. कोणत्याही पुरस्काराची अपेक्षा न ठेवता निस्वार्थपणे कार्य करीत राहावे, ही शिकवण आम्हाला ‘भाऊं’नेच दिली होती, असे त्यांनी यावेळी सांगितले. मार्गदर्शनाचा आपल्यालाही फायदा झाल्याचे समशेर खान यांनी सांगितले. यावेळी डॉ. गोल्हर यांनीदेखील भाऊंच्या आठवणींना उजाळा दिला. चारुलता नायगावकर यांनी अतिथींचा परिचय करून दिला. याशिवाय विशाखा जोशी यांनी पुरोहित यांचा, तर डॉ. नीलिमा पोहणे व योगेश घुग्घुसकर यांनी अनुक्रमे शमशेर खान व महेंद्र पाटील यांचा परिचय करून दिला. शिरीष यांनी केले. कार्यक्रमाला मोठ्या संख्येने क्रीडाप्रेमी, प्रशिक्षक, खेळाडू उपस्थित होते.