आ. किसन वानखेडे यांनी दिला 7 लाखांचा निधी
उमरखेड,
MLA Kisan Wankhede मागील अनेक शंभर वर्षांपासून मरसूळ गावात सार्वत्रिक अंत्यसंस्कार करण्यासाठी दहन शेड नव्हते. मात्र ग्रामस्थांच्या सततच्या पाठपुराव्यातून अखेर दहन शेडला मंजुरी मिळून शेड उभारणीच्या कामाला सुरुवात झाली आहे. मरसूळ आमदरी जोड रस्त्यालगत दहनशेडसाठी जागा मिळाली असून अंत्यसंस्कार सर्वांनाच व्यवस्थित करता यावेत म्हणून या परिस्थितीची जाणीव लक्षात घेऊन आमदार किसन वानखेडे यांच्या फंडातून 7 लाख रुपये निधी उपलब्ध करून देण्यात आला आहे.
MLA Kisan Wankhede मरसूळच्या दहनशेडसाठी स्वतःची जागा उपलब्ध नव्हती. त्यामुळे कोणताही मृत्यू झाला की मोठी कसरत करून अंतिम संस्कार गावाशेजारी, शेतातच पार पाडावा लागत असे. मग पावसाळा आला की सर्वांनाच आता काय करायचं हा प्रश्न पडायचा. पण आता अंतिम सोपस्कार पार पाडण्यासाठी गावकèयांना सोईचे होणार आहे.