म.न.पा.च्या नादुरुस्त बसेसवर विरोधकांचा संताप

    दिनांक :14-May-2026
Total Views |
नागपूर
Municipal Corporation  म.न.पा.च्या नादुरुस्त व कबाडी सदृश बसेस शहरात धावत असल्याचा आरोप संजय महाकाळकर यांनी केला. मोरभवन येथे पाहणीदरम्यान काही बसेसमध्ये हँडब्रेक नसल्याचेही आढळले. बसेसची दुरुस्ती पूर्ण झाल्याशिवाय त्या रस्त्यावर चालवू नयेत, अन्यथा कारवाई केली जाईल, असा इशारा देण्यात आला. तसेच प्रवाशांसाठी बसण्याची व पिण्याच्या पाण्याची सुविधा उपलब्ध करून देण्याच्या सूचना प्रशासनाला करण्यात  आल्या.
 
ashok
 
 
मोरभवन येथे पाहणी दौऱ्यादरम्यान शैलेश पांडे आणि शकील पटेल यांच्यासह केलेल्या तपासणीत अनेक बसेस अत्यंत खराब अवस्थेत आढळल्या.Municipal Corporation  काही बसेसमध्ये हँडब्रेक नसल्याचेही निदर्शनास आले. तरीही या बसेस शहरातील मार्गांवर सुरू असल्याने प्रवाशांच्या सुरक्षिततेबाबत गंभीर प्रश्न निर्माण झाला आहे. सर्व बसेसची पूर्ण दुरुस्ती झाल्याशिवाय त्या रस्त्यावर चालवू नयेत, अशी मागणी केली. अन्यथा संबंधित ऑपरेटरवर कारवाई करण्याचा इशाराही देण्यात आला.
सौजन्य :अशोक माटे,संपर्क मित्र