नागपूरचे कमाल तापमान ४४.० अंश सेल्सिअस
नागपूर,
Nagpur weather is hot बुधवारी सायंकाळी नागपुरात मेघगर्जनेसह पाऊस झाल्यानंतर काही वेळापर्यंत दिलासा वाटला. मात्र गुरुवारी दिवसभर कडक ऊनामुळे चटके जाणवत होते. हवामान विभागाने शहराचे कमाल तापमान ४४.० अंश सेल्सिअस नोंदवले. तर बुधवारी कमाल ४४.२ अंश सेल्सिअस नोंदवले होते. सकाळपासूनच कडक ऊन असल्याने दुपारच्या उष्णतेच्या झळा बसत होत्या.
Nagpur weather is hot हवामान विभागाच्या माहितीनुसार, विदर्भात उष्णतेची लाट कायम असून, पुढील काही दिवस तापमान असेच चटके देणारे राहणार आहे. नागरिकांनी दुपारच्या वेळी सावधगिरी बाळगणे आवश्यक झाले आहे. हवामानातील बदलामुळे अनेक भागांमध्ये अवेळी हलका पाऊस होत आहे. मे महिन्यातील पुढील १५ दिवस आणि जुन महिन्यात सुध्दा नागपूरकरांना उष्णतेचा येणार आहे. दरम्यानच्या काळात अधूनमधून मेघगर्जनेसह पाऊस होणार असल्याची माहिती हवामान विभागाने दिली आहे.
अकोला ४५.९ अंश सेल्सिअस
नागपूरसह विदर्भातील अकोला, वर्धा, आणि अमरावतीमध्ये तापमान वाढतच आहे. नागपूर जिल्ह्यांमध्ये तापमान ४४.० अंश तर वर्धा ४५.५ अंश सेल्सिअस, अमरावती ४५.२ अंश सेल्सिअस पर्यंत पोहोचले आहे.