नागपूर,
Poetry collection Prakashanनिलय देशपांडे यांचा ‘शब्दनिलय’ हा चारोळी काव्यसंग्रह उत्साहपूर्ण वातावरणात प्रकाशित झाला. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी प्रमुख अतिथी म्हणून अजय देशपांडे व सई देशपांडे उपस्थित होते. यावेळी दोघांनीही काव्यसंग्रहाबाबत आपले मनोगत व्यक्त करत लेखकाच्या साहित्यिक प्रवासाचे कौतुक केले.
लेखक निलय देशपांडे यांनीही आपल्या मनोगतातून काव्यनिर्मितीमागील भावना व अनुभव उपस्थितांसमोर मांडले. कार्यक्रमाचे प्रस्ताविक, सूत्रसंचालन व आभार प्रदर्शन श्री. विनय देशपांडे यांनी प्रभावीपणे पार पाडले.या प्रकाशन सोहळ्यास देशपांडे परिवार तसेच मित्रमंडळी मोठ्या संख्येने उपस्थित होती. कार्यक्रम आनंददायी आणि संस्मरणीय वातावरणात संपन्न झाला.
सौजन्य:भालचंद्र देशपांडे,संपर्क मित्र