औषध विक्रीसाठी आलेल्या परिवाराला मारहाण

    दिनांक :14-May-2026
Total Views |
बाभुळगावात पाचजण जखमी

बाभुळगाव, 
बाभुळगाव बस स्थानकाजवळ मध्यरात्री अज्ञात हल्लेखोरांनी Sale of Ayurvedic Medicines आयुर्वेदिक औषधी विक्रीकरिता मुक्कामी आलेला परिवार झोपेत असताना हल्ला केला. या हल्ल्यात आयुर्वेदिक औषधी विकणारे पाच जण जखमी झाल्याची घटना गुरुवारच्या पहाटे घडली. वर्धा जिल्ह्यातील आर्वी येथील रहिवासी कुसुम जब्बरसिंह जितोडिया हिने दिलेल्या तक्रारीनुसार त्यांचा परिवार आयुर्वेदिक औषधी विक्रीकरिता बाभुळगाव बसस्थानकाजवळ एका शेतात तात्पुरता निवारा उभारून तीन दिवसांपासून मुक्कामी होता.
 
 
marhan
 
गुरुवारच्या पहाटे तीन-चार अज्ञात हल्लेखोरांनी या परिवारावर जबर हल्ला केला. यात जब्बरसिंग चितोडिया, सुजनसिंग ठाकूर, विनोदसिंग ठाकूर, गीता ठाकूर व सुनीता चितोडिया हे पाच जण जखमी झाले. सर्वांना रुग्णालयात हलविण्यात आले आहे. या जखमींजवळून अज्ञात हल्लेखोरांनी सोन्याची नथ, चांदीचे पैंजण, रोख 20 हजार रुपये, असा एकूण 26,500 रुपयांचा ऐवज बळजबरीने हिसकावून नेला. बाभुळगाव पोलिसांनी या आरोपींविरुद्ध विविध कलमांन्वये गुन्हा दाखल केला असून वेगवेगळी पथके आरोपीच्या शोधात रवाना केली आहे.
 
 
Sale of Ayurvedic Medicines  घटनेची माहिती मिळताच अपर पोलिस अधीक्षक अशोक थोरात, उपविभागीय पोलिस अधिकारी दिनेश बैसाणे, स्थानिक गुन्हा शाखा पोलिस निरीक्षक सतीश चवरे, पोलीस निरीक्षक दीपमाला भेंडे यांनी घटनास्थळ गाठले. पुढील तपास सहायक निरीक्षक रोहित बेंबरे करीत आहेत. सीसीटीव्ही फूटेज, आजूबाजूचे साक्षीदार आणि रेकॉर्डवरील गुन्हेगार यांना तपासल्या जात असून लवकरच आरोपींना अटक होण्याची शक्यता वर्तवली जात आहे.