बोगस बियाण्यांची विक्री रोखण्यासाठी दक्ष रहा

    दिनांक :14-May-2026
Total Views |
*जिल्हाधिकार्‍यांचे निर्देश
*जिल्हास्तरीय कृषी निविष्ठा समन्वय समितीची सभा
 
वर्धा, 
Sale of Spurious Seeds खरीप हंगाम लवकरच सुरू होणार असून मोठ्या प्रमाणावर बियाणे व खतांची विक्री होणार आहे. जिल्ह्यात बोगस व एचटीबीटी बियाण्यांची विक्री रोखण्यासाठी भरारी पथकाची स्थापना करण्यात यावी. कृषी केंद्रे व सीमावर्ती भागात तपासणी मोहीम राबविण्यात यावी. जिल्ह्यात बोगस बियाण्यांची विक्री होऊ नये, यासाठी दक्ष राहण्याचे निर्देश जिल्हाधिकारी वान्मथी सी. यांनी कृषी विभागाला दिले. जिल्हास्तरीय कृषी निविष्ठा समन्वय समितीची सभा जिल्हाधिकारी कार्यालयात आयोजित करण्यात आली होती, त्यावेळी त्या बोलत होत्या. यावेळी जिपचे मुख्य कार्यकारी अधिकारी पराग सोमण, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी अरविंद उपरीकर, कृषी विकास अधिकारी शिवाजी जाधव, खत वाहतूकदार प्रतिनिधी रवी शेंडे तसेच कृषी व्यवसायी संघाचे अध्यक्ष मनोज भुतडा यांच्यासह संबंधित अधिकारी व प्रतिनिधी उपस्थित होते.
 
 
bogas biyane
(संग्रहित छायाचित्र) 
 
Sale of Spurious Seeds  खरीप हंगाम २०२६-२७ साठी ४ लाख १८ हजार ९७५ हेटर क्षेत्रावर पेरणीचे नियोजन करण्यात आले. त्यासाठी ८७ हजार १८४ विंटल बियाण्याची मागणी शासनाकडे करण्यात आली असल्याचे बैठकीत सांगण्यात आले. रासायनिक खतांच्या मंजूर आवंटनानुसार तालुकानिहाय पुरवठ्याबाबत चर्चा करण्यात आली. खरीप हंगामासाठी १ लाख १७ हजार १९० मेट्रिक टन खतांची मागणी करण्यात आली असून त्यामध्ये युरिया ३६ हजार ७५० मे. टन, एस. एस. पी. २८ हजार ५५० मे. टन, एम. ओ. पी. २ हजार ८५० मे. टन, डी. ए. पी. १३ हजार २४० मे. टन तसेच संयुत खत ३५ हजार ८३० मे. टन खताचा समावेश आहे. शेतकर्‍यांच्या तक्रारींचे तात्काळ निवारण करण्यासाठी जिल्हास्तरावर नियंत्रण कक्ष सुरू करण्यात आला आहे. टोल फ्री क्रमांकावर तक्रारी नोंदविण्याचे आवाहन करण्यात आले आहे.