आक्षेपार्ह दस्तऐवज जप्त
यवतमाळ,
Search of Jeweler's यवतमाळ तालुका प्रशासकीय समन्वय समितीचे अध्यक्ष तथा तहसीलदार व सहायक निबंधक, सहकारी संस्था यांच्या समितीच्या आदेशानुसार सावकारी पथकाने बुधवार, 13 मे रोजी यवतमाळ येथील पलक ज्वेलर्स, विनायक ज्वेलर्स, राठी ज्वेलर्स व वेदधारिणी ज्वेलर्सच्या दुकानात झडती कार्यवाही करण्यात आली. यामध्ये आक्षेपार्ह दस्तऐवज, सौदेपत्र, खरेदीखत व इतर कागदपत्रे जप्त करण्यात आली. या चारही ज्वेलर्सच्या विरुद्ध महाराष्ट्र सावकारी (नियमन) अधिनियम 2014 कलम 16 नुसार अर्जदार शुभांगी राहुल गुल्हाने यांचा सोमवार, 11 मे रोजी अवैध सावकारी करीत असल्याबाबत तक्रार प्राप्त झाली होती.
या अर्जाच्या अनुषंगाने पडताळणी करण्याकरीता सावकारी पथकाने बुधवार, 13 मे रोजी पलक ज्वेलर्स, विनायक ज्वेलर्स, राठी ज्वेलर्स व वेदधारिणी ज्वेलर्सची झडती घेतली. त्यापैकी दोन परवानाधारक सावकार असून दोघे विनापरवानाधारक सावकार आहेत. या कारवाई आक्षेपार्ह कागदपत्रे जप्त करण्यात आली आहे. या कागदपत्राची पडताळणी करून महाराष्ट्र सावकारी (नियमन) अधिनियमांमधील तरतुदीनुसार पुढील कारवाई प्रस्तावित करण्यात येणार आहे.
Search of Jeweler's ही कारवाई सावकारांचे सहायक निबंधक तथा सहायक निबंधक रीता निनावे यांच्या नियोजनानुसार चार सावकारी पथक नेमण्यात आले. पथक 1 मध्ये घाटंजी सहायक निबंधक कैलाश खटारे, पथक 2 मध्ये दारव्हा सहायक निबंधक हिरूळकर, पथक 3 मध्ये यवतमाळ सहायक निबंधक रीता निनावे, पथक 4 मध्ये आर्णी सहायक निबंधक प्रकाश झळके हे सर्व पथकप्रमुख आणि इतर कर्मचारी, तसेच ग्रामवसूल अधिकारी व मंडळ अधिकारी तसेच पोलिस सहभागी होते.
ही कारवाई जिल्हाधिकारी तथा जिल्हा प्रशासकीय समितीचे अध्यक्ष विकास मीना, तसेच जिल्हा पोलिस अधीक्षक कुमार चिंता, जिल्हा उपनिबंधक नानासाहेब चव्हाण, तहसीलदार डॉ. योगेश देशमुख, पोलिस निरीक्षक सुनील नाईक तथा तालुका प्रशासकीय समितीच्या मार्गदर्शनात सहकार व महसूल विभाग आणि पोलिस अधिकारी व कर्मचाèयांनी पार पाडली.