*विहिरीतील गाळ उपसा, खोलीकरण थंडबस्त्यात
आष्टी (श.),
Severe Water Scarcity निधी मंजूर होऊनही विहिरीतील गाळ उपसा व खोलीकरण थंडबस्त्यात पडल्याने तालुयातील बोरखेडी व बांबर्डा या गावांतील नागरिकांना सध्या भीषण पाणी टंचाईला सामोरे जावे लागत आहे. गावात पाणी नसल्याने महिलांसह गावकर्यांना बैलबंडीसह मिळेल त्या वाहनाने भर उन्हात पाणी आणावे लागत आहे. विशेष म्हणजे, या कामासाठीचा करारनामा झाला आहे. मात्र, प्रत्यक्षात काम न झाल्याने मंजूर निधी जिरला कुठे, असा आरोप माजी सरपंच लता काढताई यांनी केला आहे.
Severe Water Scarcity तालुयातील बांबर्डा व बोरखेडी या गावांना उन्हाळ्यात पाणी टंचाईच्या समस्येला नेहमीच तोंड द्यावे लागते. या दोन्ही गावाला पाणी पुरवठा करणार्या सार्वजनिक विहिरीतील गाळ उपसा व खोलिकरणाकरिता निधी मंजूर केला होता. मंजूर निधीतून काम करण्याचा करारनामा बांबर्डा ग्रामपंचायतने एका कंत्राटदाराकडून केला. एक वर्षाचा कालावधी लोटला तरी बोरखेडी व बांबर्डा येथील सार्वजनिक विहिरीचे खोलीकरण व गाळ उपसा करण्यात आला नाही. निधी मंजूर असताना काम का केले नाही, हा संशोधनाचा विषय ठरत आहे. याविषयी अधिकार्यांकडे वेळोवेळी लेखी तक्रारी करण्यात आल्या. शिवाय गटविकास अधिकारी नागेश ढोरे यांच्याशी चर्चाही झाली. त्यामुळे ते काम आज-उद्या होईल या आशेवर गावकरी होते. पण, काम सध्या थंडबस्त्यात पडले आहे.
चौकशी करून दोषींवर कारवाईची मागणी
या दोन्ही गावात दोन दिवसाआड पाणी पुरवठा केला जात आहे. त्यामुळे ग्रामस्थांना दोन ते तीन किमी अंतरावरील शेत शिवारातील विहिरीतून पाण्याची उचल करून बैलबंडीच्या सहाय्याने गावात आणावे लागत आहे. या प्रकरणी जिल्हा प्रशासनातील अधिकार्यांनी लक्ष घालून चौकशी करून दोषींवर कठोर कारवाई करावी अशी मागणी होत आहे.