भरधाव ट्रकने पाेलिस बॅरिकेड उडवले

- कर्तव्यावरील पाेलिस कर्मचारी गंभीर जखमी

    दिनांक :14-May-2026
Total Views |
अनिल कांबळे
नागपूर,
collision with police barricade अमरावती महामार्गावर वाहन तपासणी सुरू असताना एका भरधाव ट्रकने पाेलिस बॅरिकेडला धडक दिली. या अपघातात कर्तव्यावर असलेले एक पाेलिस कर्मचारी गंभीर जखमी झाले असून आराेपी ट्रक चालकाला पाेलिसांनी ताब्यात घेतले आहे. लक्ष्मण चिंधूजी पहाडकर (47, टाकळी, सेलू, जि. वर्धा) असे आराेपीचे नाव आहे.
 
 
collision with police barricade
 
माहितीनुसार, बुधवारी पहाटेच्यापूर्वी एमआयडीसी वाहतूक शाखेचे प्रभारी पाेलिस निरीक्षक विनय धुमाळ यांच्या मार्गदर्शनात पाेलिस उपनिरीक्षक रतन उंबरकर, नारायण चाैधरी, प्रुल्ल बाेंदरे, सुजीत, प्रतिक आणि संताेष हे पथक वाडी पाेलिस ठाण्याच्या हद्दीत नागपूर-अमरावती राेडवर हायवे-ग्लाेरीच्या विरुद्ध बाजूला नाकाबंदी करून वाहनांची तपासणी करत हाेते. दरम्यान, आयशर ट्रक (एमएच 32 एजे 3060) घेऊन येणाèया चालकाने आपला ट्रक भरधाव वेगाने आणि निष्काळजीपणे चालवून तिथे लावलेल्या बॅरिकेडला जाेरदार धडक दिली. ही धडक इतकी जाेरात हाेती की, बॅरिकेड उडून तिथे उभे असलेले पाेलिस अंमलदार संताेष कांगुलवार यांच्या अंगावर आदळले. या अपघातात कांगुलवार यांना गंभीर दुखापत झाली. त्यांना वाडी येथील खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले असून त्यांच्यावर उपचार सुरू आहेत.collision with police barricade धडक मारून पळून जाणाèया ट्रक चालकाचा नागरिकांनी पाठलाग करून काही अंतरावर पकडले आणि पाेलिसांच्या ताब्यात दिले. या प्रकरणी वाहतूक शाखेचे पाेलिस हवालदार नारायण चाैधरी यांनी दिलेल्या तक्रारीवरून, वाडी पाेलिसांनी आराेपी ट्रक चालकाविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.