वीज पडून विद्यार्थ्याचा जागीच मृत्यू ः दुसरा गंभीर

    दिनांक :14-May-2026
Total Views |
अनिल कांबळे
नागपूर,
nagpur news कामठी तालुक्यांतर्गत येणाऱ्या भिलगाव गावातील हस्तिनापूर परिसरातील एका मैदानातील कडूनिंबाच्या झाडाखाली थांबलेल्या 2 शालेय विद्यार्थ्यांवर वीज पडली. या अपघातात एका शालेय विद्यार्थ्यांचा जागीच दुर्दैवी मृत्यू झाला तर एक विद्यार्थी गंभीर जखमी झाला. ही घटना बुधवारी सायंकाळी साडे पाच दरम्यान घडली. उज्वल सुनील भेलावे(15, तिवारीनगर, भिलगाव) असे मृत मुलाचे नाव आहे तर देवांश कपूर पारधी(वय 15, भिलगाव, कामठी) जखमी मुलाचे नाव आहे. जखमी देवांशवर कामठीच्या आशा हाॅस्पिटलमध्ये उपचार सुरु आहेत.
 

nagpur news 
 
 
प्राप्त माहितीनुसार, उज्वल आणि देवांश हे दाेघे घरामागील माेकळ्या मैदानात क्रिकेट खेळायला गेले हाेते. अचानक वातावरणात बदल हाेऊन अवकाळी वादळी पाऊस पडायला लागला. पावसापासून बचाव करण्यासाठी मैदानातील कडूनिंबाच्या झाडाखाली उभे हाेते.nagpur news अचानक विज कडाडून कडूनिंबाच्या झाडावर पडल्याने या झाडाखाली उभ्या दाेन विद्यार्थ्यापैकी एकाचा जागीच मृत्यू झाला. तर दुसरा गंभीर जखमी झाला. घटनेची माहिती मिळताच यशाेधरानगर पाेलिसांनी त्वरित घटनास्थळ गाठून पंचनामा केला. उज्ज्वल हा नवव्या वर्गातील विद्यार्थी असून जरीपटका येथील महात्मा गांधी शाळेतील विद्यार्थी आहे.