नागपूर - sugandh sabhagruh, dharampeth नलिनी रेवतकर या नवोदित कवयित्री व बाबा नानक हायस्कूल येथून सेवानिवृत्त झालेल्या शिक्षिका यांनी रचलेल्या "घरटं," "ढगचिमणीचे लग्न", "चांदण्याच घर", "आईचे लाड" या चार बालकाव्य संग्रह पुस्तकाचे प्रकाशन एकाचवेळी ज्येष्ठ कवयित्री डॉ. आशा पांडे यांचे हस्ते धरमपेठ येथील सुगंध सभागृहात करण्यात आले.
याप्रसंगी खासदार रामदास तडस, निवृत्त सनदी अधिकारी आविनाश झाडे, सेवानिवृत्त प्राचार्य बळवंतराव मोरघडे व विश्वकांत झाडे, बालकवी शंकरराव विटनकर, कवी शशिकांत शर्मा, नीरा गुप्ता, प्रामुख्याने मंचावर उपस्थित होते. सर्वांनी नलिनी रेवतकर यांनी बालपणीचे विश्व, आईचे प्रेम, अदभुत व रम्य निसर्गाचे वर्णन अत्यंत सुंदरपणे आपल्या काव्य संग्रहातून केल्याबद्दल त्यांचे कौतुक केले. या सोहळ्याचे संचालन अर्पण रेवतकर तर आभार धनराज रेवतकर यांनी मानले. यासाठी भूमिका रेवतकर, संकेत मोरघडे, आकांक्षा मोरघडे आदी परिश्रम घेतलेत.
सौजन्य: देवराव प्रधान,संपर्क मित्र