मध्य रेल्वेने काही गाड्यांचे मार्गही बदलले
नागपूर,
Trains bound for Pune cancelled मध्य रेल्वेच्या पुणे विभागात दौंड-मनमाड मार्गावरील अकोलनेर-अहिल्यानगर-निंबळक स्थानकांदरम्यान दुहेरीकरणाच्या कामासाठी प्री-नॉन इंटरलॉकिंग (प्री-एनआय) आणि (एनआय) कामे करण्यात येणार आहेत. यासाठी विशेष ट्रॅफिक आणि पॉवर ब्लॉक घेण्यात येणार असून, त्यामुळे काही रेल्वे गाड्या रद्द करण्यात आल्या आहेत. तर काही गाड्यांच्या मार्गात तात्पुरते बदल करण्यात आले आहेत.
Trains bound for Pune cancelled यानुसार १२११४ नागपूर-पुणे, गरीबरथ एक्स्प्रेस १५ आणि १७ मे रोजी नागपूरहून रद्द राहील. तसेच १२११३ पुणे-नागपूर गरीबरथ एक्स्प्रेस आणि १८ मे रोजी पुण्याहून रद्द करण्यात आली आहे. याशिवाय १२१३६ नागपूर-पुणे एक्स्प्रेस १६ मे रोजी नागपूरहून, तर पुणे-नागपूर एक्स्प्रेस १७ मे रोजी पुण्याहून रद्द राहणार आहे. दरम्यान, १७ मे रोजी २२८४५ पुणे-हटिया एक्स्प्रेस ही बदललेल्या मार्गाने लोणावळा, कर्जत, पनवेल, कल्याण, इगतपुरी, नाशिक रोड आणि मनमाड मार्गे हटियाकडे जाईल. २२१४० अजनी-पुणे एक्स्प्रेस ही मनमाड, नाशिक रोड, कल्याण, पनवेल, कर्जत आणि लोणावळा मार्ग पुण्याला पोहोचेल. याचप्रमाणे १२२२१ पुणे-हावडा एक्स्प्रेस १८ मे रोजी पुण्याहून ३० मिनिटे उशिराने सुटणार असल्याची माहिती रेल्वे प्रशासनाने दिली आहे.