रेल्वे कर्मचारी महासंघाचे आज अधिवेशन
नागपूर,
Vacancies in the Railway रेल्वेमधील रेल्वे रनिंग स्टाफ प्रवर्गातील कर्मचार्यांच्या २.५० लाख रिक्त जागा भरल्यामुळे रेल्वे कर्मचार्यांवर कामाचा बोझा वाढत चालला आहे. वंदेभारत, राजधानी एक्सप्रेस व इतर अनेक रेल्वे गाडया चालविणार्यांचे कामाचे तास वाढत आहे. त्याचा परिणाम कर्मचार्यांच्या आरोग्यावर होत असल्याने भरती प्रक्रिया राबविण्याची मागणी नॅशनल रेल्वे मजदूर युनियनचे सरचिटणीस वेणू पी. नायर यांनी पत्रपरिषदेत केली. रेल्वे कर्मचार्यांच्या प्रलंबित प्रश्नावर चर्चा करण्यासाठी शुक्रवार, मे रोजी सकाळी १० वाजता डॉ.वसंतराव देशपांडे सभागृह येथे अखिल भारतीय रनिंग स्टाफ परिषदेचे आयोजन करण्यात आले आहे.या परिषदेत देशभरातील एक हजारावर पदाधिकारी सहभागी होणार असल्याची माहिती नायर यांनी दिली.
रेल्वेमधील रेल्वे रनिंग स्टाफ प्रवर्गातील कर्मचार्यांसमोरील समस्या दिवसेंदिवस वाढत असल्याने यावर ठोस उपाययोजना करण्याची गरज आहे. नॅशनल रेल्वे मजदूर महासचिव शिवगोपाल मिश्रा परिषदेला संबोधित करतील. रेल्वेमधील रेल्वे रनिंग स्टाफ ही सर्वात संवेदनशील आणि सुरक्षिततेवर भर देणारी परिचालन श्रेणींपैकी एक आहे. यामध्ये प्रामुख्याने शंटिंग ऑपरेशन्स, मालगाड्या, ईएमयू, एमईएमयू सेवा, मेल,एक्स्प्रेस गाड्या आणि वंदे भारत, राजधानी, शताब्दी व दुरंतो सेवांसह हाय-स्पीड गाड्यांवर कार्यरत असलेले लोको पायलट, सहाय्यक लोको पायलट आदींचा आहे.
Vacancies in the Railway मालगाड्या, प्रवासी गाड्या, मेल, एक्स्प्रेस, हाय-स्पीड गाड्यांच्या ट्रेन व्यवस्थापकांना देशभरातील गाड्यांचे सुरक्षित संचालन सुनिश्चित करण्याची मोठी जबाबदारी असते. लोकोपायलट हवामानाची पर्वा न करता रात्रंदिवस अथकपणे काम करतात आणि राष्ट्राची जीवनरेखा असलेल्या रेल्वे वाहतुकीचे कामकाज सुरळीत चालावे म्हणून घाम गाळतात. या परिषदेत कर्मचार्यांच्या विविध प्रश्नावर सखोल चर्चा केल्या जाणार सुमारे १४ ठरावांचे मसुदे एकमताने मंजुरीसाठी सभागृहासमोर सादर केले जातील.