महिलांच्या सुरक्षेवर पुन्हा प्रश्नचिन्ह, दिल्लीतील बसमध्ये सामूहिक बलात्कार

चालक-वाहक अटकेत

    दिनांक :14-May-2026
Total Views |
नवी दिल्ली,
gang rape देशाची राजधानी दिल्ली पुन्हा एकदा महिलांच्या सुरक्षेच्या प्रश्नावरून चर्चेत आली आहे. पश्चिम दिल्लीतील नांगलोई परिसरात एका महिलेवर खासगी बसमध्ये सामूहिक बलात्कार झाल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. या प्रकरणी पोलिसांनी तातडीने कारवाई करत बसचा चालक आणि वाहक या दोघांना अटक केली आहे.
 
 
gang rape
 
 
मिळालेल्या माहितीनुसार, पीडित महिलेने पोलिसांकडे तक्रार दाखल केल्यानंतर संपूर्ण प्रकरण उघडकीस आले. तक्रारीच्या आधारे दिल्ली पोलिसांनी गुन्हा नोंदवत आरोपींना ताब्यात घेतले. संबंधित खासगी बसही पोलिसांनी जप्त केली असून तपासासाठी तिची पाहणी करण्यात येत आहे. ही घटना नेमकी कधी आणि कोणत्या परिस्थितीत घडली, याचा सध्या दिल्ली पोलीस सखोल तपास करत आहेत. पीडितेचे जबाब नोंदवण्यासोबतच घटनास्थळ आणि बसमधील पुरावेही तपासले जात आहेत.gang rape पोलिसांकडून परिसरातील सीसीटीव्ही फुटेजचीही छाननी सुरू आहे.
या घटनेमुळे राजधानी दिल्लीतील महिलांच्या सुरक्षेचा मुद्दा पुन्हा ऐरणीवर आला आहे. सार्वजनिक वाहतुकीत महिलांच्या सुरक्षेसाठी करण्यात येणाऱ्या उपाययोजनांवरही प्रश्नचिन्ह उपस्थित होत आहे. पोलिसांनी आरोपींविरोधात कठोर कारवाई करण्याचे संकेत दिले असून पुढील तपास सुरू आहे.