महिलांनो, आत्मरक्षणासाठी दुर्गा बना!

    दिनांक :14-May-2026
Total Views |
काजल हिंदुस्थानी यांचे आवाहन
दर्यापुरात सभेला प्रचंड गर्दी
दर्यापूर, 
Women's Self Defense महिलांवर होणार्‍या अत्याचाराला आळा बसवायचा असेल तर आत्मरक्षणासाठी दुर्गा बनावे लागेल. आपल्या मुलांवर चांगले संस्कार करा, मोबाईलच्या अति वापरापासून दूर रहा, अनोळखी व्यक्तीला मोबाईलवर मित्र बनवू नका, असे आवाहन सुप्रसिद्ध वक्त्या काजल हिंदुस्थानी यांनी दर्यापूरमधील भरगच्च सभेत केले. सकल हिंदू समाज व गोपाल अरबट मित्र परिवाराच्या वतीने या सभेचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी मंचावर कार्यक्रमाच्या अध्यक्षा म्हणून मोर्शीच्या नगराध्यक्षा प्रतीक्षा गुल्हाने, प्रमुख पाहुणे अंजनगावचे नगराध्यक्ष अविनाश गायगोले तर प्रमुख उपस्थितीमध्ये शिवसेना जिल्हाप्रमुख सुनील डिके, सहसंपर्क प्रमुख गजानन वाकोडे, मार्गदर्शक रवींद्र गणोरकर, महिला आघाडी जिल्हाप्रमुख अरुणा इंगोले, जयश्री कातकिडे, वंदना दारव्हेकर, मदत कक्षाच्या सोनाली देशमुख, तालुका प्रमुख छाया निचळ, मीनाक्षी कपले, डॉ. भावना भुतडा, भारतीय जनता पार्टीच्या मेघा भारती, प्रगती पोटे, वर्षा उफाळे, विद्या अरबट, अपर्णा मालठाने, प्रा. प्रणिता बिजवे, वृंदा मुक्तेवार, भाग्यश्री सगणे, प्रीती उमाळे, डॉ. दिनेश म्हाला यांचा समावेश होता.
 
 
shakti
 
Women's Self Defense  शहरातील बस स्थानक चौकात असलेल्या कन्या शाळेच्या मैदानात आयोजि या कार्यक्रमात काजल हिंदुस्थानी यांना ऐकण्यासाठी मोठी गर्दी जमली होती. विशेषतः महिला मोठ्या प्रमाणात एकत्र आल्या होत्या. यावेळी दर्यापूर पोलिसांनी चोख बंदोबस्त ठेवला होता. आपल्या प्रखर वाणीतून काजल हिंदुस्थानी यांनी लव्व जिहाद, लँड जिहादचे भीषण वास्तव लोकांसमोर मांडले. यासाठी देव, देश, धर्म याबाब चे संस्कार आपल्या मुलांवर करण्याचे आवाहन करीत महिलांनी आत्मरक्षणासाठी दुर्गा बनण्याचे सुद्धा आवाहन काजल हिंदस्थानी यांनी केले. शिवसेना नेते गोपाल अरबट यांच्या जन्मदिवसाचे औचित्य साधून या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी महेंद्र भांडे, तुषार चौधरी, राहूल भुंबर, नागोराव केने, प्रा. विनोद बिजवे, नीलेश टवलारकर, विलास साखरे, नंदू निकोले, हेमंत उमाळे, सागर गेठे, तुषार चौधरी, नीरज नागे, मुन्ना इसोकार, नगरसेवक स्वप्निल गावंडे, रोशन कट्यारमल, नगरसेवक गणेश धुराटे, कपिल पोटे आदींनी परिश्रम घेतले