सार्वजनिक कार्यक्रमाच्या आयोजनास परवानगी नाही
विद्यार्थी कामगार व नागरिकांच्या सुरक्षेच्या दृष्टीने उपाययोजना करा
आयुक्त विजयालक्ष्मी बिदरी यांच्या सूचना
नागपूर,
Yellow Alert Issued हवामान विभागाने विभागातील नागपूर व वर्धा जिल्ह्यात संभाव्य उष्णता लाटेच्या ( हीट वेव्ह ) पार्श्वभूमीवर येलो अलर्ट जाहीर केला आहे. या पार्श्वभूमीवर विद्यार्थी, कामगार व नागरिकांनी सतर्क राहण्याचे आवाहन विभागीय आयुक्त विजयालक्ष्मी बिदरी यांनी केले आहे. सध्या तापमानात मोठ्या प्रमाणात वाढ होत उष्णतेच्या लाटेची तीव्रता विभागात नागपूर व वर्धा जिल्ह्यात अधिक राहणार असल्याचे जाहीर केले असून, विभागात करावयाच्या उपाययोजनांबाबत विभागीय आयुक्त विजयालक्ष्मी बिदरी यांच्या अध्यक्षतेखाली विभागीय आयुक्त कार्यालयाच्या सभागृहात विशेष बैठक आयोजित करण्यात आली होती.
Yellow Alert Issued हवामान विभागाच्या हीट वेव्ह संदर्भात सकाळी अकरा ते दुपारी साडेचार वाजेपर्यंत नागरिकांच्या संरक्षणासाठी सार्वजनिक कार्यक्रम आयोजित नये तसेच विद्यार्थी, कामगार व नागरिकांच्या सुरक्षितेच्या दृष्टीने सर्व आस्थापना व महाविद्यालयांनी आवश्यक उपाययोजना कराव्या असे सक्त निर्देश यावेळी देण्यात आले.
उष्णतेवर उपचारासाठी औषधीचा साठा
आपत्ती व्यवस्थापन अधिनियमांतर्गत सर्व जिल्हाधिकारी यांनी उष्णतेच्या लाटेच्या पार्श्वभूमीवर जिल्ह्यात उपायोजना राबवताना प्रत्येक प्राथमिक आरोग्य केंद्रामध्ये कोल्ड वार्ड तयार करावे तसेच उष्णतेवर उपचार करण्यासाठी औषधीचा साठा तयार सूचना देण्यात आल्या आहेत. विभागात मे व जून महिन्यात उष्णते संदर्भात अलर्ट लागू राहणार आहे. उष्माघातामुळे विभागात अतिदक्षता घेताना उष्माघाताच्या रुग्णांवर तात्काळ उपचार होईल याची खबरदारी घेण्यात यावी, उष्मघातासंदर्भात करावयाच्या उपाययोजना सर्वसामान्य जनतेपर्यंत पोहोचविण्यासाठी जनजागृती करावी तसेच महानगरपालिका क्षेत्रात सेंटर होम सारख्या सुविधा उपलब्ध करून द्याव्यात यावेळी बैठकीत आले.
उष्णतेच्या लाटेसंदर्भात उपाययोजना लागू
नागपूर व चंद्रपूर महानगरपालिका क्षेत्रात यासंदर्भात उपाय योजना लागू करण्यात आल्या असून, नागपूर महानगरपालिकेतर्फे प्रत्येक चौकात ग्रीन नेट तसेच आरोग्य केंद्रात आवश्यक सुविधा, शाळा महाविद्यालय, कोचिंग सेंटर आदींना सूचना देण्यात आल्याचे महानगरपालिका आयुक्त डॉ. विपीन इटनकर यांनी यावेळी सांगितले. नागपूर जिल्ह्यामध्ये उष्णतेच्या उपाययोजना लागू करण्यात आल्या असून, उपाययोजना १६ जून पर्यंत लागू राहतील, असे जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद यांनी बैठकीत सांगितले.