पाच दिवसात चार मुलांना जन्म!

नैसर्गिक प्रसूतीची विक्रमी नोंद

    दिनांक :15-May-2026
Total Views |
संभळ
Natural Delivery एकापेक्षा जास्त अपत्यांचा जन्म तोही नैसर्गिक प्रसूतीद्वारे...ही घटना सर्वसामान्य नसते. त्यातही संभळमधील एका महिलेने चार बाळांना जन्म दिला आहे. विशेष म्हणजे पाच दिवसात नैसर्गिक प्रसूतीद्वारे ही बाळं जन्माला आली आहेत. वैद्यकीय क्षेत्रातील या अभूतपूर्व घटनेमुळे डॉक्टरही अवाक् झाले आहेत.
 
sambhal news 
Natural Delivery संभळ येथे किराणा दुकान चालवणारे मोहम्मद आलिम यांचा दोन वर्षांपूर्वी निकाह झाला. त्यांची पत्नी अमीना यांच्या पोटी 9 मे रोजी पहिल्या बाळाचा जन्म झाला. त्यानंतर गुरुवारी दुसèया मुलाचा आणि नंतर दोन मुली जन्माला आल्या. अशा पाच दिवसात चार अपत्यांचा जन्म झाला. अमीना यांची प्रसूती डॉक्टरांसमोर मोठे आव्हान होते. गर्भात चार जीव होेते आणि आईची प्रकृती ठीक नव्हती. त्यातच अमीना यांना वेळेआधीच प्रसूती वेदना सुरू झाल्या. डॉक्टरांनी सतत तपासणी करत बाळ आणि आईला सुरक्षित ठेवले. इतकी जोखीम असतानाही चारही मुले सामान्य प्रसूतीने जन्माला आली, यामुळे डॉक्टरही आश्चर्यचकित झाले.
Natural Delivery वैद्यकीय क्षेत्रातील दुर्मिळ घटना
डॉक्टरांच्या मते, वैद्यकीय क्षेत्रातील ही अतिशय दुर्मिळ घटना आहे. अमीना गर्भवती झाली तेव्हापासूनच तिच्या जीवाला धोका होता. दुसèया महिन्यातच तिच्या गर्भात चार बाळं असल्याचे लक्षात आले होते. ही सर्व अर्भके वेगवेगळ्या पिशवीत होती. त्यामुळे हे जास्तच संवेदनशील प्रकरण होते. सुरुवातीलाच डॉक्टरांनी तिला गर्भपाताचा सल्ला दिला होता. पण, कुटुंबीयांनी हे बाळ जिवंत ठेवण्याचा निर्णय घेतला. डॉ. शुभ्रा अग्रवाल आणि त्यांच्या टीमने आपले कसब पणाला लावून बाळ आणि बाळंतीणीला सुरक्षित ठेवले. सध्या बाळांचे वजन कमी आहे. त्यामुळे त्यांना वैद्यकीय देखरेखीखाली ठेवले आहे.