तभा वृत्तसेवा
यवतमाळ,
ashwini-pendse : येथील उत्कृष्ट कवयित्री अश्विनी प्रशांत पेंडसे यांना त्यांच्या साहित्यिक क्षेत्रातील कामाची दखल घेऊन महाराष्ट्र साई पद्मश्री पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.
ओम साई प्रतिष्ठान व बीबीसी फिल्म प्रॉडक्शनच्या वतीने राष्ट्रीय पातळीवरील महाराष्ट्र साई पद्मश्री पुरस्कार शनिवारी सकाळी 10 पासून शिर्डी येथील परिवार लॉन्स बँक्वेट हॉलमध्ये हा कार्यक्रम पार पडला.
अतिशय उत्साही व मंगलमय वाद्यांच्या सुमधुर आवाजात नामांकित सेलिब्रेटीज किशोर कालदा, अॅड. इकबाल खान, सुदाम संसारे यांच्या हस्ते महाराष्ट्र व गोवा राज्यातील 275 मान्यवरांना विविध क्षेत्रात उल्लेखनीय कार्य केल्याबद्दल हा प्रतिष्ठेचा पुरस्कार देऊन गौरविण्यात आले. या भव्य पुरस्कार सोहळा महाराष्ट्रातील सुमारे 1500 लोकांच्या उपस्थितीत पार पडला.