वर्धेतून एटीएसने एकाला उचलले; पुणे बॉम्ब स्फोट प्रकरण

    दिनांक :15-May-2026
Total Views |
वर्धा,
pune bomb blast case काही दिवसांपूर्वी पुण्यात एका रुग्णालयात बॉम्ब स्फोट प्रकरणी एटीएसच्या अधिकार्‍यांनी पुलगाव रेल्वे स्टेशन येथुन एकाला ताब्यात घेतले. या प्रकरणी वर्धेचे पोलिस अधीक्षक सौरभ अग्रवाल यांनीही दुजोरा दिला आहे.
 

pune bomb blast case 
 
मिळालेल्या महितीनुसार, पुणे येथे एका खाजगी रुग्णालयात बॉम्ब ठेवल्याचा प्रकार घडला होता. त्या प्रकरणातील आरोपीला शोधण्यासाठी पोलिस पथक तयार करण्यात आले होते. पुणे येथील एटीएस पथक शोध घेत होते तर सोलापूर पोलिसांनाही आरोपी हवा होता. आरोपी शालिग्राम एसप्रेसने येत असल्याची माहिती वर्धा पोलिस अधीक्षक अग्रवाल यांना देण्यात आली होती. दरम्यान, पुणे आणि नागपूर येथील एटीएस पथकाने पुलगाव रेल्वे स्टेशन येथे आरोपीला ताब्यात घेतले असल्याची माहिती पोलिस अधीक्षक अग्रवाल यांनी दिली.pune bomb blast case ताब्यात घेतलेल्या आरोपीचे नाव शिवाजी राठोड असल्याचे सांगण्यात येते. विशेष म्हणजे ज्या रुग्णालयात बॉम्ब ठेवण्यात आला ते हडपसर भागातील मल्टी स्पेशालिटी उषाकिरण हॉस्पिटलमध्ये वर्धेचे सेवानिवृत्त प्राध्यापक विजय बोबडे यांचे व्याही यांचे असुन बोबडे यांचा मुलगा व सुन त्याच रुग्णालयात प्रॅटीस करतात.