नागपूर,
Beltarodi Police Station बेलतरोडी पोलीस ठाण्याच्या हद्दीतील महाकाली नगर झोपडपट्टी परिसरात दहावी व बारावी परीक्षेत यश मिळवलेल्या २१ गुणवंत विद्यार्थी-विद्यार्थिनींचा सत्कार करण्यात आला. अत्यंत प्रतिकूल आर्थिक परिस्थितीतही विद्यार्थ्यांनी मेहनत व जिद्दीच्या जोरावर उल्लेखनीय यश संपादन केले.
पोलीस आयुक्त रविंद्र सिंगल यांच्या हस्ते विद्यार्थ्यांना मोमेंटो व प्रशस्तीपत्र देऊन गौरविण्यात आले. यावेळी त्यांनी विद्यार्थ्यांना शिस्त, सातत्य व सकारात्मक विचारांचे महत्त्व सांगत प्रेरणादायी मार्गदर्शन केले.Beltarodi Police Station कार्यक्रमाला पोलीस अधिकारी, सामाजिक कार्यकर्ते, पालक व नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
सौजन्य:अशोक माटे,संपर्क मित्र