नागपूर,Bhagwati Girls High Schoolलोकमान्य टिळक जनकल्याण शिक्षण संस्था द्वारा संचालित भगवती गर्ल्स हायस्कूलचा सत्र २०२५-२६ मधील दहावी बोर्ड परीक्षेचा निकाल १०० टक्के लागला आहे.या सत्रात एकूण १०९ विद्यार्थीनी परीक्षेला प्रविष्ट झाल्या होत्या. त्यापैकी ३७ विद्यार्थीनी प्राविण्य श्रेणीत,५० प्रथम श्रेणीत तर २२ द्वितीय श्रेणीत उत्तीर्ण झाल्या आहेत. इच्छा कोल्हे हिने ९८.४० टक्के गुण मिळवून प्रथम क्रमांक पटकावला,समृद्धी खडसे हिने ९१.२० टक्के गुण मिळवून द्वितीय क्रमांक मिळवला.गेल्या सलग २१ वर्षांपासून शाळेचा निकाल १०० टक्के लागत आहे.
या यशामागे विद्यार्थिनींसाठी घेण्यात आलेले अतिरिक्त वर्ग, पालकांशी सतत संपर्क तसेच विविध विषयांच्या शिबिरांचे आयोजन हे महत्त्वाचे घटक असल्याचे मत प्राचार्या श्रीमती वनिता बोहरूपी यांनी व्यक्त केले.विद्यार्थिनींच्या या यशाबद्दल संस्थेचे अध्यक्ष डॉ. सतीश चतुर्वेदी, सचिव आभा चतुर्वेदी, प्राचार्या वनिता बोहरूपी, पर्यवेक्षक अतुल दोनोडे तसेच सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी अभिनंदन केले.
सौजन्य:वीरेंद्र जोगी,संपर्क मित्र